पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा १०८ वा वर्धापन दिन भोर तालुक्यातील बॅंकेच्या सर्व शाखांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. भोर शहरात असणाऱ्या बँकेच्या दोन्ही शाखांमध्ये शेतकरी,कष्टकरी, सर्वसामान्य, जेष्ठ नागरिक महिला खातेदारांकडुन दिप प्रज्वलन ,पूजन करून बॅंकेचा वर्धापन दिन साजरा झाला. यावेळी पीडीसीसी बँकेचे मोठ्या प्रमाणात खातेदार उपस्थित होते. बँकेत विद्युत रोषणाई तसेच रांगोळीने ,फुलांच्या माळी लावून सजावट केली होती. भोर तालुक्यात बँकेच्या ११ शाखा असून सर्वच बँकेतून पीडीसी बँकेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला .
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना दिनांक ४ सप्टेंबर १९१७ साली झाली असून बँकेच्या स्थापनेपासून बॅंकेचा सातत्याने ऑडिट वर्ग ‘अ’ असून कार्यक्षेत्र पुणे जिल्हा आहे. बँकेच्या एकूण २९० शाखा व ४ विस्तारीत कक्ष संगणकीकृत असून कोअर बँकिंग सेवा कार्यरत आहे.बँकेची आर्थिक स्थिती मार्च २०२५ अखेर ठेवी – १४७६६.८४ कोटी ,कर्जे व्यवहार १२०५९.०३ कोटी , स्व.निधी ३४५७.२८ कोटी, वसूल भागभांडवल ,४६०.५३ कोटी ,ढोबळ नफा ४३९.६१ कोटी ,खेळते भांडवल २३९२६.३३ कोटी आहे . तर सीडी रेशो ८१.६६ % आहे .शेतकऱ्यांची व सर्वसामान्यांची हक्काची बँक म्हणून पीडीसीसी बँकेचा नावलौकिक आहे. प्रशिक्षित सेवक वर्ग व अद्यवायत संगणीकृत सेवा, सर्व शाखांमार्फत बँकिंगच्या तत्पर सेवा उपलब्ध, सर्व शाखांमार्फत कोअर बँकिंग (Any where Banking) सेवा उपलब्ध, ए.टी.एम. (A.T.M./P.O.S.) सेवा उपलब्ध, ए.टी.एम. मोबाईल व्हॅन सेवा उपलब्ध, RTGS / NEFT / मोबाईल बँकिंग / नेट बँकिंग सुविधा उपलब्ध, बँकेच्या बी.जे.रोड शाखेमध्ये फ्रैंकिंग सेवा उपलब्ध आहेत असे बँकेचे अधिकारी बाळासाहेब चव्हाण, सत्यवान आवाळे, विनोद काकडे ,शाम घोणे ,संकेत खुटवड, नेहा मळेकर ,सुप्रिया नांगरे, धनंजय भिलारे, प्रताप खुटवड यांनी सांगितले.