२००१-२००२ बॅचच्या १२० विद्यार्थ्यांची उपस्थिती
भोर एज्युकेशन सोसायटीच्या राजा रघुनाथराव विद्यालयाच्या सन २००१-०२ बॅचच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेह मेळावा रविवार (दि.१५) विद्यालयात शाळा भरवुन पार पडला. यावेळी इयत्ता दहावी अ ब क ड ई या तुकड्यांचे तब्बल १२० विद्यार्थी – विद्यार्थिनीं २४ वर्षांनी एकत्र उपस्थित राहिले आणि बालपणाच्या शालेय आठवणीत रमले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात राजा रघुनाथराव विद्यालय पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने सन्मानित झाल्याबद्दल सोसायटीचे चेअरमन, सचिव व शाळेचे मुख्याध्यापक यांनी पुन्हा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते पारितोषिक स्विकारले.
याप्रसंगी भोर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रमोद गुजर, डॉ सुरेश गोरेगावकर, मुख्याध्यापक लक्ष्मण, भांगे,प्रा नारायण वाघ , विश्वास निकम ,प्रा.अवघडे, प्रा.वाकडे, प्रा.नालबंद, प्रा.मोरे यांनी जुन्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या जुन्या शैलीत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच गणित, इंग्रजी, इतिहास, भूगोल ,चित्रकला, विज्ञान , मराठी हे विषय शिकवणारे शिक्षक या वेळी उपस्थित होते.शिक्षकांनी आपापले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. या स्नेह मेळाव्यासाठी तौसिफ आतार, उमेद गांधी , अविनाश मोरे , सुजाता मोरे, निशिगंध कांबळे, अनुप धोत्रे, सारंग इंजरकर, अमित काळे ,गौरव शिर्के, श्रीकांत तुंगतकर, मिथिल बागडे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपापली मनोगत व्यक्त केली.तसेच शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत फनी गेम्स, खेळ, फोटोग्राफी, मित्र मैत्रिणी,गप्पा गोष्टीत एक दिवस स्वताला देत तोच दिवस मित्र मैत्रिणींच्या सहवासात शाळेसाठी घालवला. या स्नेह मेळाव्यात चहा नाष्टा व उत्तम भोजनाची व्यवस्था केली होती. या स्नेह मेळाव्याचा आनंद विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे लूटत जुन्या हृदय स्पर्शी आठवणीत सर्व विद्यार्थी रमून गेले.