नगरपालिका प्रशासनाकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, पोलीस प्रशासन घटनास्थळी तातडीने दाखल
भोरला रामबाग रस्त्यालगत एसस्टी बस आगाराच्या बाजुला असणाऱ्या भंगार दुकानाला अचानक आग लागल्याची घटना सोमवारी (दि२८) दुपारी तीनच्या सुमारास घडली.
स्थानिकांनाकडुन मिळालेल्या माहितीनुसार मागील काही वर्षांपासून सुरजकुमार (मुळ रहिवासी उत्तर प्रदेश) रा. भोर या भंगार व्यावसायिकदाराचे दुकान भोर रामबाग रस्त्यालगत एसस्टी बस आगाराच्या बाजुला आहे .सोमवार दि.२८ या भंगार दुकानात दुपारी तीन वाजता अचानक आग लागली.आग आटोक्यात आणण्यासाठी त्या दुकानातील कामगारांनी प्रयत्न केले. परंतु भंगारच्या दुकानात केमिकल युक्त पुठ्ठा ,प्लास्टिक, बॉटल ,कागदी वस्तू, बॉक्स, स्क्रॅप माल असल्याने आगीने प्रचंड पेट घेतला. ही आग एवढी प्रचंड होती की,भोर शहरावर धुराचे सावट पसरल्याने ही आग पाहण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली होती. या आगीत पन्नास टन माल जळुन पंधरा ते वीसलाखांचे मोठ्या प्रमाणात या व्यावसायिकदाराच्या मालाचे नुकसान झाले असून कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही आटोक्यात आणण्यासाठी नगरपालिका प्रशासन घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन आगीच्या बंबाने आग विझवणे सुरू केले आहे. तसेच घटनास्थळी पोलीस प्रशासन तात्काळ दाखल होऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.