सासवड येथे १६ मार्चला शासकीय योजनांचा महामेळावा
भोर – पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे, भोर तालुका विधी समिती भोर, प्रांत अधिकारी कार्यालय भोर, तहसिल कार्यालय भोर, पंचायत समिती भोर, भारती विद्यापीठ लॉ कॉलेज पुणे, भोर वकिल संघटना भोर, यांच्या संयुक्त विद्यमाने राजवाडा चौक भोर व दिवाणी न्यायालय, भोर येथे शासकीय योजनांचा महामेळाव्याबात जनजागृती करण्यात आली. येणाऱ्या १६ तारखेला सासवड शासकीय योजनांचा महामेळावा होणार असून नागरिकांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. भारती विद्यापीठ लॉ कॉलेज, पुणे यांचे मार्फत पथनाट्य यावेळी सादर करण्यात आले. सदर पथनाट्यातून महिलांवर होणा-या कौटूंबीक अत्याचार ,हिंसाचार या संदर्भात जनजागृती करण्यात आली.
राजवाडा चौक येथील झालेल्या कार्यक्रमामध्ये भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांनी उपस्थीत नागरीकांना महामेळाव्यामध्ये माेठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले. सदर कार्यक्रमास गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, नायब तहसीलदार अरुण कदम, पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रितम गायकवाड, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ॲड. तेजल आहेर, ॲड. साक्षी कोंडे, भारती विदयापीठ लॉ कॉलेज, पुणे येथील प्राध्यापक सलील श्रृंगापुरे व शुभम त्रिपाठी व त्यांचे पथनाट्य सादर करणारे विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थीत होते.
तसेच, दिवाणी न्यायालय, भोर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये दिवाणी न्यायालयाच्या प्रमुख दिवाणी न्यायाधीश नेहा नागरगोजे यांनी उपस्थीतांना महामेळाव्यामध्ये माेठया संख्येने सहभागी होण्यासंदर्भात आवाहन केले तसेच महिला दिनाचे औचित्य साधून मनोगत व्यक्त केले . न्यायाधीशांनी उपस्थीत महिलांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमास भोर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड संतोष बाठे, उपाध्यक्ष ॲड. शिवाजी पांगारे व इतर सर्व वकील संघटना सदस्य, दिवाणी न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक सुमेध गुजर व न्यायालयीन कर्मचारी तसेच मोठया संख्येने नागरीक उपस्थीत होते. सदर कार्यक्रमामध्ये भोर वकील संघटनेचे ॲड संतोष बाठे, विठ्ठल दुधाणे, दिपक बोरकर यांनी मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड मनिषा तारु व आभार प्रदर्शन ॲड. शिवाजी मरळ यांनी केले. सदर जनजागृती कार्यक्रमाचा लाभ २०० ते २५० नागरीकांनी घेतला.