Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

डॅाक्टरच बनला सैतान, महिलेवर केला अत्याचार; डॅाक्टराविरोधात पाटस पोलिसांत बलात्काराचा गुन्हा

by SBPRNL
December 12, 2024
डॅाक्टरच बनला सैतान, महिलेवर केला अत्याचार; डॅाक्टराविरोधात पाटस पोलिसांत बलात्काराचा गुन्हा

पुणेः महिला रुग्णाशी डॅाक्टरने लगट करुन जबरदस्तीने तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार दौंड तालुक्यातील वरवंड येथे घडला आहे. संबंधित डॅाक्टरच्या खाजगी दवाखान्यात पीडित महिला उपचारासाठी आली होती. नराधम डॅाक्टरने पीडित महिलेशी ओळख वाढवून वेगवेगळ्या ठिकाणी नेत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात भाग पाडल्याचे पीडित महिलेने पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पाटस पोलिसांत डॅाक्टराविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

लगड करीत मारली मिठी

डॉ. सुनिल नामदेव झेंडे (मुळ रा. दिवे ता. पुरंदर, सध्या रा. वरवंड ता. दौंड) असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव असून वरवंड येथे डॉ. झेंडे हा धन्वंतरी अॅक्युप्रेशर सेंटर नावाचा आयुर्वेदिक दवाखाना चालवतो. या धन्वंतरी दवाखान्यात २१ ऑगस्ट २०२४ रोजी पीडित महिला तिला पाठीवर गाठ आली होती. यासाठी उपचार घेण्यासाठी आली होती. आरोपी डॉक्टरने तिच्याशी गोड बोलून तिला जवळ ओढत मिठी मारली. तिने आरोपीला ‘डॉक्टर तुम्ही असे काय करताय? अशी विचारणा केली. तसेच मी माझ्या घरातील लोकांना सांगेल’, असे म्हणत त्याच्यापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नराधम डॅाक्टरने ‘मला तु मला आवडतेस. आपण दोघे बाहेर फिरायला जाऊ’ असे म्हणत पुन्हा लगट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सोन्याचा राणी हार घेऊन पीडित महिलेला धमकी 

तसेच या महिलेने आरोपीच्या या मागणीला नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने त्यानंतर बळजबरीने तिला दवाखान्याच्या आतील खोलीत नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला. याविषयी कोणाला काही सांगू नकोस, नाहीतर मी तुझी बदनामी करीन, अशी पीडित महिलेला डॅाक्टरने दिली. आरोपी डॉक्टरने १९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पीडित महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने पीडित महिलेकडे सोन्याचा हार मागितला. पिडीत महिलेने भितीपोटी अडीच तोळ्यांचा सोन्याचा राणीहार घरात कोणास काही न सांगता त्याला आणून दिला.

अन्यथा…तुझ्या घरच्यांना सांगेन

दहा दिवसानंतर सोन्याचा राणीहार महिलेने डॅाक्टरला परत मागितला. मात्र, डॉक्टरने हा सोन्याचा हार परत देण्यास नकार दिला. तसेच ‘तुला तुझा राणीहार पाहीजे असेल, तर तू माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव. अन्यथा मी तुझ्या घरच्यांना याबाबत सांगेन, अशी धमकीच डॅाक्टरने दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पाटस पोलीस ठाणे गाठत डॅाक्टरविरोधात तक्रार दिली. पाटस पोलिसांनी मंगळवारी (दि. १०) संबंधित डॉक्टरविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. दौंड न्यायालयात आरोपी डॅाक्टरला हजर केले असता न्यायालयाने त्याला १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख हे करीत आहेत.

Tags: daundpataspolicepunecrimenewspurandharrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
भिगवणः मित्रच बनला वैरी…..! भांडणाचा राग अनावर झाल्याने मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घूण हत्या

सुरक्षतेचा ठपका ठेवत बांधकाम व्यावसायिकांसह चौघांवर गुन्हा दाखल; सातव्या मजल्यावर काम करताना पाय घसरुन झाला होता कामगाराचा मृत्यू

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group