Saturday, June 13, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

शिरवळः देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतुसेची विक्री करणाऱ्यास रंगेहाथ पकडले; सातारा गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई

by SBPRNL
December 2, 2024
शिरवळः देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतुसेची विक्री करणाऱ्यास रंगेहाथ पकडले; सातारा गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई

शिरवळः येथील भागात गुन्हेगारी डोकं वर करू पाहत आहे. गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगाराची प्रमाण या भागात वाढताना दिसत असून, शिरवळ पोलिसांचा गुन्हेगारांना धाक राहिला नाही का? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. या भागात देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतुसे विक्री करणार असल्याची माहिती थेट सातारा गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार सातारा गुन्हे शाखेच्या पथकाने शिरवळ येथील शिंदेवाडी नजीक असलेल्या एका कंपनीच्या मैदानावर देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतुसे विक्री करणाऱ्या एकाला रंगहाथ पकडले. या कारवाईत गुन्हे शाखेच्या पथकाने देशी बनावटीचे ४ पिस्टल आणि ४ जिवंत काडतुसे असा  २ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अरुण मोहन पाटील पोलीस हवालदार स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी शिरवळ पोलिसांत फिर्याद दिली आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २ डिसेंबर रोजी गोपनीय बातमीदारामार्फत सातारा गुन्हे शाखेच्या पोलिसांना शुभम उर्फ सोनु अनिल शिंदे व त्याचा साथिदार दिग्विजय उर्फ सनी देसाई (रा. सिंहगड कॅम्पस पुणे) हे शिंदेवाडी ता. खंडाळा जि. सातारा गावच्या हद्दीतील सातारा ते पुणे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गारच्या सर्व्हिस रोडवर प्रणय अॅग्रो कंपनीचे कंपाऊंड जवळ देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार सापळा रचून सातारा गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून ही कारवाई केली.

..अशा प्रकारे सापळा रचून केली अटक 

शिंदेवाडी ता. खंडाळा जि. सातारा गावच्या हद्दीतील सातारा ते पुणे जाणारे राष्ट्रीय महामार्ग सर्व्हिस रोडवर प्रणव अॅग्रो कंपनीचे कंपाऊंड जवळ या पथकाने आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचून थांबले होते. दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी दोन व्यक्ती मोफेडवरुन पुणे बाजूकडून प्रणव अॅग्रो कंपनीच्या बाजूकडे येताना पोलिसांना दिसले. त्यांना थांबण्याचा इशारा केला असता मोफेड चालकाने मोफेड थांबविली नाही. मोफेडवर पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीला स्टाफच्या मदतीने मोफेडवरुन खाली ओढले मात्र मोफेड चालकाने मोफेड घेवून त्या ठिकाणाहून धूम ठोकली. मोफेडवरुन खाली ओढलेला व्यक्ती पळून जात असताना त्यास पोलिसांनी पकडले. त्याच्याजवळ असलेल्या काळ्या रंगाच्या बॅगची पाहणी पोलिसांनी केली असता त्यामध्ये देशी बनावटीची व त्यास मेंग्झीन असलेली ४ पिस्टल व ४ जिवंत काडतुसे मिळून आली. पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस हवालदार लक्ष्मण जगधने, अरुण पाटील, शिवाजी भिसे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन ससाणे व रविराज वर्णकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

फरार आरोपीचा शोध सुरू 

पोलिसांनी या व्यक्तीस त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव शुभम उर्फ सोनु अनिल शिंदे (वय २४ वर्षे रा. महर्षीनगर, स्वारगेट पुणे जि. पुणे) असे सांगून त्याच्या सोबत असलेल्या पण पळून गेलेल्या व्यक्तीचे नाव सांगितले. दिग्विजय उर्फ सनी देसाई (रा. सिंहगड कॅम्पस पुणे) असे पळून गेलेल्या व्यक्तीचे नाव असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी शुभम उर्फ सोनु अनिल शिंदे याला बेड्या ठोकल्या असून त्याच्या ताब्यातील साहित्य कारवाईत हस्तगत केले आहे. तसेच फरार व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत.

Tags: crimenewspunecrimenewsrajgadnewssatarapolice
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
पारगांव: नानगावात अखंड हरीनाम सप्ताहास सुरुवात; 68 वर्षांची सांप्रदायिक परंपरा

पारगांव: नानगावात अखंड हरीनाम सप्ताहास सुरुवात; 68 वर्षांची सांप्रदायिक परंपरा

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group