Thursday, June 11, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पारगांव: नानगावात अखंड हरीनाम सप्ताहास सुरुवात; 68 वर्षांची सांप्रदायिक परंपरा

by SBPRNL
December 2, 2024
पारगांव: नानगावात अखंड हरीनाम सप्ताहास सुरुवात; 68 वर्षांची सांप्रदायिक परंपरा

पारगांव : धनाजी ताकवणे

दौंड तालुक्यातील नानगाव येथे आजपासून सोमवार दि.०२ डिसेंबर रोजी अखंड हरीनाम सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. नानगाव देवस्थान ट्रस्ट यांच्या माध्यमातून गेली ६८ वर्ष अविरत हे काम सुरू आहे. नानगाव अखंड हरीनाम सप्ताहाचे यंदाचे ६९ वे वर्ष असून ०२ डिसेंबर ते ०९ डिसेंबर या कालावधीमध्ये श्री विठ्ठल रुख्मिणी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

या कालावधीमध्ये पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ७ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी ११ ते १२ गाथाभजन, सायंकाळी ४ ते ५
प्रवचन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ७ ते ९ कीर्तन नंतर दरदिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विश्वास भोसले यांनी दिली.

‘यांचे’ कीर्तन होणार

२ डिसेंबरला ह.भ.प तुकाराम महाराज मुळीक यांचे कीर्तन झाले. ०३ डिसेंबरला ह.भ.प पंढरीनाथ महाराज आरु, ०४ डिसेंबरला ह.भ.प पोपट महाराज पाटील, ०५ ह.भ.प ताराचंद महाराज, ०६ डिसेंबरला ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज शिंदे, ०७ डिसेंबरला ह.भ.प अनिल महाराज पाटील, ०८ डिसेंबरला ह.भ.प परमेश्वर महाराज जायभाये यांचे कीर्तन रंगणार आहे.

हरिनाम सप्ताह मोठी ऐतिहासिक परंपरा

पूर्वीपासून अखंड हरीनाम सप्ताहाची परंपरा या गावाला असल्याने परिसरातील भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. दरवर्षीप्रमाणे वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र आळंदी पुणे यांचा नथुसिंग बाबा अध्यात्मिक ज्ञान प्रचार व प्रसार दौरा दौंड तालुक्यातील नानगाव या ठिकाणहून चालू होतो. आठ दिवस चालणाऱ्या अखंड हरीनाम सप्ताहात संपूर्ण परिसर हरीनामाच्या जयघोषाने दुमदुमून जातो. कीर्तन मंदिराच्या बाहेरील बाजूस होत असल्याने कीर्तनानंतर सर्वाना दरदिवशी महाप्रसाद ठेवण्यात आला आहे.

‘या’ दिवशी होणार सांगता

पूर्वी पेक्षाही कीर्तनासाठी गर्दीमध्ये मोठी वाढ होत आहे. मागील वर्षी गावतील दानशूर व्यक्तीकडून दररोज अन्नदान करण्यात आले होते. यंदा स्वखुशीने अन्नदान करण्यासाठी बहुसंख्येने भाविकांनी सहमती दर्शवली आहे. त्याप्रमाणे अन्नदाते दरदिवशी येणाऱ्या सर्व भाविकांना अन्नदान करणार आहे. अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता ०९ डिसेंबर ला होणार असून काल्याचे कीर्तन ह.भ.प पांडुरंग महाराज घुले यांचे होणार आहे.

Tags: daundrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
मुंबईः आझाद मैदानावर शपथविधीची जय्यत तयारी; महायुतीतील ‘या’ नेत्यांनी केली सभास्थळाची पाहणी, मुख्यमंत्री पदाबाबत बानवकुळेंनी दिले ‘हे’ उत्तर

मुंबईः आझाद मैदानावर शपथविधीची जय्यत तयारी; महायुतीतील 'या' नेत्यांनी केली सभास्थळाची पाहणी, मुख्यमंत्री पदाबाबत बानवकुळेंनी दिले 'हे' उत्तर

ताज्या बातम्या

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group