जेजुरीः शीघ्रकवी शाहीर सगनभाऊ यांच्या १७६ व्या पुण्यतिथीनिमित्ताने शहरातील जुन्या पालखी तळ येथे तीन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन शीघ्रकवी शाहीर सगनभाऊ स्मृती मंच, जेजुरी यांच्या वतीने करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून शाहीर सगनभाऊ यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत विविध संगीताच्या कार्यक्रम भरविण्यात येतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोककलेला मानाचे स्थान देण्यात येते. दि. २९ नोव्हेंबर ते दि. १ डिसेंबर असे तीन चाललेल्या संगीत महोत्सवाची सांगता लोककला तमाशा या कार्यक्रमाने करण्यात आली. जेजुरी व पंचक्रोशतील रसिक जनतेला या तीन दिवस लाभलेल्या कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही कलेच्या क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांना शीघ्रकवी शाहीर सगनभाऊ स्मृती मंच जेजुरी यांच्या वतीने शाहीर सगनभाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये अरुण गायकवाड, लावणीसम्राज्ञी संगीता लाखे, मालती इनामदार लोकनाट्य तमाशा मंडळ(राष्ट्रपती पुरस्कार विजेते) यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सगनभाऊ स्मृती मंचाचे अध्यक्ष गोविंद कुडाळकर, उपाध्यक्ष उमोल बेलसरे, कार्याध्यक्ष उन्मेष बारभाई, सचिव अतुल आगलावे, खजिनदार घनशाम मोरे, उत्सव समिती अध्यक्ष चंद्रकांत लाखे यांनी कार्यक्रमासाठी काम केले. तसेच इतर सदस्यांनी कार्यक्रम चांगला पार पडण्यासाठी हातभार लावला.
आयोजनकांनी केली ‘हे’ आवाहन
कोणताही कार्यक्रम चांगला होण्यासाठी आर्थिक पाठबळ महत्वाचे असते. यामुळे आयोकांनी पुढच्या वर्षी येणाऱ्या या कार्यक्रमाला देणगी स्वरुपात सढळ हातांनी मदत करावी जेणेकरुन लोककला आजच्या बदलत्या काळातही टिकवून राहिल असे आवाहन स्मृती मंचाच्या वतीने करण्यात आले.