राजगड: तालुक्यातील एका 18 वर्षांच्या मुलाला रस्त्याच्या दुरावस्थेमुळे जीवाला मुकावे लागले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खराब रस्त्यावरून रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने संदेश संभाजी इंगुळकर (वय १८) या तरुण मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. संजयच्या अशा अकाली जाण्याने त्याच्या संपूर्ण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रस्ता सुस्थितीत असता तर कदाचित आज माझा मुलगा हयात असता अशी संतप्त प्रतिक्रिया संदेशच्या वडिलांनी व्यक्त केली.
रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाला अन
संदेश ला वयाच्या पाच वर्षापासून अस्थमाचा त्रास होता परंतु त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर तो त्रास बरा झाला होत 10 नोव्हेंबर रोजी शेतात काम करत असताना त्यांना त्याला पुन्हा एकदा त्रास जाणवू लागला तात्काळ त्याला नसरापूरच्या दिशेने रुग्णवाहिकेतून देण्यात आले. गावापासून नसरापूरकडे जाण्यासाठी निघाले. मात्र, अंबवणेमार्गे अत्यंत खराब रस्ता असल्याने ते कोदवडीमार्गे नसरापूर दिशेने चालले असता, अत्यंत खराब रस्त्यामुळे गाडी सावकाश चालवावी लागत होती. त्यातच गुंजवणी नदीवरील कोदवडी येथील अरुंद पुलावर भात काढण्यासाठी आलेला हार्वेस्टर त्या पुलावर अडकला होता. त्या ठिकाणी वीस ते पंचवीस मिनिटे वेळ गेला. तिथून पुढे करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र असून नसल्यासारखे आहे.
निकृष्ट रस्त्याने घेतला जीव
संदेशचा त्रास वाढू लागल्याने त्यांच्या कुटुंबाने नसरापूरकडे जाण्याचा निर्णय घेतला. नसरापूरकडे जाणाऱ्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने व नसरापूर गावात जाण्यासाठी बनेश्वर फाट्यापासून मोठी गर्दी असल्याने ट्रॅफिक जाम झाल्याने दवाखान्यापर्यंत पोहचण्यासाठी सुमारे दीड तास लागला. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. संदेशला रुग्णालयात असणाऱ्या डॉक्टरांनी मृत घोषित केले.