पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे, भोर तालुका विधी समिती व भोर वकिल संघटनेचा आणखी एक दर्जेदार उपक्रम
भोर – पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे, भोर तालुका विधी समिती व भोर वकिल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भोर नगरपरिषदेच्या महाराणा प्रताप प्राथमिक विद्यालय येथे उपस्थित असणा-या बालदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना कायदेवषियक मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कायदेविषयक व्याख्यानमालेमध्ये भोर दिवाणी न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश नेहा नागरगोजे यांनी उपस्थीत विद्यार्थ्यांना एकदम सोप्याभाषेत बालदिनाची माहिती व बालकांचे कायदे ओळख समजावून सांगितले. तसेच ॲड. विक्रम घोणे यांनी बालदिन व बालकांचे हक्क व अधिकार यासंबधी कायदेविषयक माहीती मुलांना सोप्या शब्दात दिली. त्यांनतर उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी शैक्षणिक वस्तुंचे वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षा एन नागरगोजे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक राजेंद्र जायवंत यांनी केले, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सहशिक्षिका भारती मोरे यांनी केले. सदर कार्यक्रमास न्यायालयीन कर्मचारी कैलास आखाडे व जालिंदर माने उपस्थित होते. सदर कायदेविषयक कार्यक्रमाचा लाभ ४० विद्यार्थ्यांना घेतला.