महिलांचा समावेश, शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
रक्तदान हे श्रेष्ठदान समजून भोर तालुक्यातील वेळवंड खो-यचे प्रवेशद्वार असणाऱ्या बसरापुर या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त व या गावचे युवक कै.अनिकेत कुंभारकर याच्या स्मरणार्थ अमर तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. महिलांनी रक्तदान करत गावात एक वेगळा आदर्श निर्माण केला . गावातील एकूण ३५ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले.
सर्वोदय समाज विकास संस्थेचे अध्यक्ष रोहिदास घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली घोलप रक्त केंद्र(ब्लड बॅंक) आणि थॅलेसेमिया सेंटर पुणे यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबीर पार पडले. रक्तदानासारखे दुसरे कोणतेही नि:स्वार्थी कर्तव्य नाही. रक्तदान ही काळाची गरज ओळखून अमर तरुण मंडळाने हे रक्तदान आयोजित केले होते. यावेळी बसरापुर गावचे सरपंच संतोष झांजले, माजी सरपंच सुर्यकांत बदक, तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र झांजले, उपाध्यक्ष रमेश झांजले, ज्ञानेश्वर झांजले, अमोल कुंभारकर,तेजस बदक,सागर झांजले, ज्ञानेश्वर साळुंके,राहुल झांजले,पंकज झांजले, अक्षय झांजले, सौरभ झांजले, अभिजित झांजले,प्रतिक वीर , विकास साळुंके,वैभव कुंभारकर,समीर वीर , भोलेनाथ साळुंके कार्यकर्ते उपस्थित होते. या गावात एक गाव एक शिवजयंती असुन शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. किल्ले तोरणावरून या गावात शिवज्योत आणण्यात आली होती.