पारगांवः प्रतिनिधी धनाजी ताकवणे
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल पारगांव ता. दौंड जि. पुणे. विद्यालयातील विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कुस्ती या क्रीडा प्रकारात विद्यालतील एकूण ६ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित दौंड तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ कर्मयोगी कुस्ती प्रशिक्षण केंद्र पारगाव या ठिकाणी घेण्यात आल्या होत्या. या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज पारगाव विद्यालयातील एकूण ६ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.
स्पर्धेत विजयी झालेले विद्यार्थी खालीलप्रमाणेः
१४ वर्षे खालील वयोगट:
रणवीर तानाजी गव्हाणे ( ३८ किलो ) प्रथम क्रमांक, प्रकार फ्री स्टाईल
शंभूराजे संदीप पेटकर ( ४१ किलो ) प्रथम क्रमांक, प्रकार फ्री स्टाईल
१७ वर्षे खालील वयोगट
आदिनाथ रोहिदास टूले (४५ किलो ) प्रथम क्रमांक, प्रकार फ्री स्टाईल
सार्थक सचिन साळुंखे (५५ किलो ) प्रथम क्रमांक, प्रकार ग्रीको रोमन
आदित्य गौतम जगताप (५५ किलो ) प्रथम क्रमांक, प्रकार ग्रीको रोमन
१९ वर्षे खालील वयोगट
ओंकार सुनील नलगे (७२ किलो ) प्रथम क्रमांक, प्रकार ग्रीको रोमन
वरील विदयार्थ्यांना कर्मयोगी कुस्ती प्रशिक्षण संस्था पारगावचे कुस्ती प्रशिक्षक रवींद्र बोत्रे सर व विद्यालयातील शिक्षकांचे यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी झालेल्या सर्व स्पर्धेकांचे विदयालयाचे मुख्याध्यापक सवाने जे. सी. यांनी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले. विजयी झालेल्या सर्व स्पर्धकांचे शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्कूल कमिटी, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ सर्व सदस्यांनी कौतुक केले.