पुणेः चार महिन्यांपूर्वी रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलाला स्वारगेट पोलिसांनी मध्य प्रदेशातील (जबलपूर) स्थानिक पोलिसांच्या मदतीने रेल्वे स्थानक जबलपूर येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी पुणे पोलिस आयुक्तांनी ५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. चार महिन्यांपूर्वी शहरातील अल्पवयीन मुलगा रागाच्या भरात आपल्या राहत्या घरातून निघून गेला होता. त्याचा शोध पुणे पोलिस गेल्या चार महिन्यांपासून घेते होते. परंतु, मुलाचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. अखेर पोलिसांनी तत्परता दाखवित सदर मुलाचे फोटो व त्याची माहिती इत्यादी गोष्टी विविध राज्यातील पोलिसांना कळविण्यात आली होती. तब्बल चार महिन्यानंतर या मुलाचा शोध लावण्यात स्वारगेट पोलिस पथकाला यश आले असून, या मुलाला मध्यप्रदेशातील जबलपूर येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
हा मुलगा जबलपूर रेल्वे स्थानकात असल्याची खात्रीलायक माहिती तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले यांना मिळाली. त्या अंनुषगाने परिमंडल २ च्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारती विद्यापीठ दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जबलपूर येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने सदर बालकाला तेथून ताब्यात घेऊन त्याच्या आई वडिलांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. या कामगिरीबद्दल पोलिस आयुक्त पुणे शहर यांनी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. ही कामगिरी अप्पर पोलिस आयुक्त प्रवीण पाटील, स्मर्तना पाटील पोलिस आयुक्त, नंदिनी वग्यानी सहाय्यक पोलिस आयुक्त (स्वारगेट विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारती विद्यापीठ दशरथ पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलिस अमंलदार फिरोज शेख, हर्षद शिंदे याच्या पथकाने सदरची कामगिरी केली आहे.