बंगलूरच्या आयटी इंजिनिअर असलेल्या अतुल सुभाष यांनी एक व्हिडिओ शूट करत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. अतुल हे एका खाजगी कंपनीत चांगल्या हुद्यावर होते. पण बायकोच्या सततच्या जाचाला कंटाळून त्यांनी स्वःताला संपवण्याचं ठरवलं. त्यांची लग्न अगदी काही वर्षांपूर्वी एका मॅन्ट्रीमोनी साईटवरून जळून आलं होतं. पण बायकोने घटस्फोट घेत त्यांना कोर्टात खेचलं. त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यांना अनेकवेळा मोठ्या रक्कमेची मागणी करण्यात येत होती. तसेच त्यांची टर उडवून पैसे मिळाले नाहीत तर खोर्टात खेचेल अशी धमकी त्यांची घटस्फोटित बायको त्यांना देत होते. या सततच्या होणाऱ्या जाचाला कंटाळून अखेर सुभाष यांनी आत्महत्या केली. एनसिआरबीने आता देशभरात पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या पुरुषांची आकडेवारी जाहीर केली आहे. या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
देशभरात २०२२ मध्ये एकूण ४,२३७ पुरुषांनी पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे हा अहवाल सांगतो. या अहवालात महाराष्ट्राचा क्रमांक एकवर असून महाराष्ट्रात ६९७ पुरुषांनी वैवाहिक जीवनाला कंटाळून आपले जीवन संपवले आहे. त्यानंतर उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांचा नंबर लागतो. उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश राज्यात अनुक्रमे ५२९ आणि ३५८ पुरुषांनी आत्महत्या केली आहे. लढाक, चंदीगढ, ओडिसा, मणिपूर,पुद्दुचेरी या ठिकाणी एकही आत्महत्या झाली नसल्याची माहिती आकडेवरून दिसते. एकूणच अतुल सुभाष यांनी उचलेलं टोकाचं पाऊन सगळ्यांना हादरून टाकणार असून त्याहीपेक्षा त्यांना किती जाच सहन करावा लागला त्याच्या वेदना सांगताना सगळेच हाकबून जातात. यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून याकडे लक्ष देण्याचे गरच आता सर्वंच स्तरातून केली जात आहे.