बारामतीत वितरित झाला गुणवंत शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळा.
भोर प्रतिनिधी – कुंदन झांजले.
भोर: पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी ,पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२३ सन्मान सोहळा बुधवार (दि.२७) बारामती येथे पार पडला
भोर तालुक्यातील तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आणि राजगड ज्ञानपीठ येसाजी कंक माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक विश्वनाथ नथू दामगुडे यांना तसेच रायरेश्वर माध्यमिक विद्यालय टीटेघरचे मुख्याध्यापक संतोष ओतारी, बाजी पासलकर विद्यालयाचे शिक्षक भानुदास थोपटे, कान्होजी जेथे विद्यालय कारीचे शिक्षक हनुमंत शिंदे तर संत अडबलनाथ सिद्ध विद्यालयाच्या शिक्षिका सुजाता चौगुले यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
या पुरस्काराचे वितरण राज्य टी डी एफ चे कार्याध्यक्ष जी के थोरात, विश्वस्त के एस ढोमसे, पीडीसीसी बँकेचे संचालक संभाजी होळकर ,माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले यांच्या हस्ते झाले.यावेळी पंकज घोलप, प्रदीप गाढवे, मुरलीधर मांजरे, स्वाती उपार, स्नेहलता बाळसराफ नंदकुमार सागर, भोर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक नथुराम दामगुडे ,कृषी अधिकारी दत्तात्रय कावळे, धोंडीबा कुमकर ,सुनील वीर ,जयवंत थोपटे ,संजय तळेकर ,राजेंद्र शेटे, सुभाष भेलके ,दीपक बांदल ,रोहिदास जगताप ,चंद्रकांत नांगरे ,राजेंद्र चौगुले, श्रीरंग रवळेकर, गोपीचंद म्हस्के , चंद्रकांत पारवे, संतोष बुदगुडे आदिंसह मोठ्या संख्येने मित्रपरिवार व आपल्या नातेवाईक उपस्थित होते.
राजगड ज्ञानपीठाच्या मानद सचिव स्वरूपा थोपटे यांनी व राजगड संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुरस्कार प्राप्त गुणवंत शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तालुक्यातुनही सर्व स्तरातून गुणवंत शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.