सासवडः राज्यातील हाय व्होल्टेज समजलेली जाणारी विधानसभेची निवडणूक म्हणून पुरंदर विधानसभेकडे पाहिले जात आहे. निवडणुकीच्या रिंगणात प्रचाराची राळ उमेदवारांनी उडवून दिल्याचे दिसत असून, पुरंदरकरांच्या मनात मा. मंत्री विजय शिवतारे यांना अधिक पसंती मिळत आहे. शिवतारे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, तालुक्यातील गावे, वाड्या वस्त्या येथील मतदारांशी ते संवाद साधत आहे. त्यांच्या दौऱ्याला तालुक्यातील बहुतांशी भागातून पसंती मिळताना दिसत आहे. तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी, शिवतारे यांच्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यांनी तब्बल १० वर्षे या मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केलेले आहे, यामुळे त्यांच्या पाठीशी दांडगा प्रशासन हाताळण्याचा अनुभव आहे. दुसऱ्या बाजूला आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली असली, तरी तालुक्यातील अनेक भागांतील जनतेची त्यांना नापसंती दर्शवित आहेत. मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे नवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. यामुळे सहाजिकच शिवतारे यांचे पार जड असल्याचे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता दिसून येत आहे.
विद्यमान आमदारांना ‘त्या’ विधानाने फटका बसण्याची शक्यता
२००९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत विजय शिवारे यांनी विजयाचा गुलाल उधळल्यानंतर २०१४ मध्ये पुन्हा ते येथून विधानसभेत गेले. या दोन्ही वेळी विद्यमान आमदार संजय जगताप यांना पराभव पत्करावा लागला. २०१९ मध्ये मात्र, संजय जगताप यांनी विजय शिवतारे यांचा पराभव केला. २०१९ नंतर विधान सभेवर जाताच जगताप यांनी येथील महत्वकांशी योजनेसाठी आपण स्वःखर्चाने पाणी आणू असे आश्वसन दिले होते. मात्र, अजूनही त्या योजनेचे घोडं अनेक कारणांमुळे अडकून पडलेले आहे. या आश्वासनाचा सगळ्यात मोठा फटका विद्यमान आमदारांना या निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या ५ वर्षांच्या कार्यकाळात जगताप यांनी कोणतीच कामे केली नाहीत, म्हणून मतदारांमध्ये त्यांच्या बद्दल नाराजीचा सूर कायम असल्याचे दिसत आहे.
विजय शिवतारे पुन्हा रिंगणात
मूळात शिवतारे यांनी दोन वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या इथल्या प्रश्नांची नसनानस त्यांना ज्ञात आहे. गुंजवणीचे पाणी, पुरंदर उपसा, आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिवे येथील आंतरराष्ट्रीय बाजार, वाहतूकीसाठी करण्यात आलेली रस्त्यांची कामे, फुरसुंगी देवाची उरळी यांना स्वतंत्र नगरपरिषेद आदी कामांसाठी त्यांना प्रयत्न करून आवाज उठविल्याने त्यांना मतदारांची साथ लाभताना दिसत आहे. तसेच शिवतारे यांचा मतदार संघात दांडगा जनसंपर्क आहे. यामुळे त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत होऊ शकतो.
नवा चेहरा म्हणून संभाजीराव
पुरंदर विधानसभेसाठी दोनच उमेदवार रिंगणात असतील असे सगळ्यांचा वाटत असताना मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी सुरूवातीला अपक्ष मग नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमदेवारीची माळ आपल्या गळ्यात पाडू घेतली. त्यांच्याकडे मतदार संघातील मतदार नवा चेहरा म्हणूनच पाहता आहेत. झेंडे यांचा प्रचारात माजी शासकीय अधिकारी असा प्रचार करण्यात येत असून, शासकीय कामे कशी करवून घेतली जातात, हे त्यांना माहिती आहे असे सांगितले जात आहे. त्याचा कितपत फायदा त्यांना होत हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
पुरंदरचा किल्लेदार विजय शिवतारेच
असे एकूण चित्र पुरंदर विधानसभेचे असून, विजय शिवतारे यांनी कमबॅम केलेल्या सर्वांना सावध पाऊले उचलून निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. शेवटी राजकारणात काहीही होऊ शकते. विजय शिवतारे हे या भागात बाप्पू नावाने ओळखले जातात. त्यांच्या १० वर्षांच्या कार्रकीर्दमधील अनेक विकासकामे त्यांना मतदार संघात राबवलेली आहेत. यामुळे त्यांना या निवडणुकीत निश्चितच या गोष्टींचा फायदा होणार असून, विजय शिवतारे हेच पुरंदरचे किल्लेदार होणार असे येथील जनता म्हणत आहे.