भोर – भोर ,वेल्हा, मुळशी हा मतदारसंघ नसुन हे माझे कुटुंब आहे हि सभा नसून माझ्या कुटुंबाची भेट आहे, येथे आलेला प्रत्येकजण मला आशिर्वाद देण्यासाठी आला आहे, कोणत्याही अपेक्षेने आला नाही,मी कोणत्याही कार्यकर्त्यास सभेला आणा असे सांगितले नव्हते ,या सर्व महिला, बघिनी, नागरिक मला आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित झाले आहेत असे वक्तव्य भोर येथे झालेल्या प्रचारसभेत किरण दगडे यांनी केले.
२०३ भोर वेल्हा मुळशी मतदार संघाचे अपक्ष उमेदवार किरण दगडे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ गुरूवारी रायरेश्वराच्या मंदिरात अभिषेक होम हवन करत केला आणि त्यांच्या प्रचाराची जाहीर सभा भोर येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात गुरुवार (दि.७) पार पडली.यावेळी प्रचारार्थ प्रमुख उपस्थिती सिनेअभिनेते, दिग्दर्शक सुपरस्टार प्रविण तरडे उपस्थित होते. प्रविण तरडे यांनी सध्याचा काळ महाराष्ट्रात अपक्ष उमेदवारांचा काळ आहे .जो गोरगरिबांचा मी त्याचा, मी स्वतः मुळशीत किरणचा प्रचार करणार आहे कोणत्याही सरकारी शासकीय योजना, अनुदान,कोणाचा पैसा पाठिशी नसताना किरणने जनतेची कामे केली आहेत.जमिनी विकत घेणा-यां विरोधात जमिनी राखणारा किरण अपक्ष उमेदवार उभा आहे त्याच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे रहा असे आवाहन करीत येत्या २३ तारखेला किरणच्या विजयाच्या मिरवणुकीत मी येथे असणार असे तरडे यांनी सांगितले.
यावेळी पियुषा दगडे, राहुल दगडे, समीर घोडेकर,भाबवडीचे आदर्श सरपंच अमर बुदगुडे, योगेश शेलार, रोहन भोसले, नवनाथ डाळ आदि कार्यकर्ते उपस्थित होते व तालुक्यातुनही मोठ्या संख्येने नागरिक,महिला, तरुण,तरूणी,जेष्ठ नागरिक उपस्थित होते. मला एकदा आमदार करुन पहा महिलांची रोज दिवाळी होईल असे मी काम करणार आहे, एम आय डी सी , आरोग्य, क्रीडा संकुल, कुस्ती संकुल, महिलाबचत गटांसाठी मिटिंग हॉल, मुलींच्या लग्नासाठी मोफत कार्यालय या तालुक्यात उभारणार असल्याचेही किरण दगडे यांनी सांगितले.