मुंबईः कालच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ पार पडला. आज दि. ६ नोव्हेंबर रोजी राजभवनात विधानसभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणूून कालिदास कोळंबकर यांनी शपथ घेतली. उद्यापासून तीन दिवस विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने कालिदास कोळंबकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे राज्यपाल पी.व्ही.राधाकृष्णन यांनी कोळंबकर यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि राज्याच्या मुख्य प्रधान सचिव सुजाता सौनिक हे उपस्थित होते.
उद्यापासून तीन दिवस म्हणजेच दि.७, ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलण्यात आल्याने कोळंबकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोळंबकर हे सलग ९ वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून विधासभेवर निवडून आलेले आहेत. यानंतर पुन्हा विधासभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांचीच नियुक्ती करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.