पुणेः येथील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी शिवसेना (उबाठा) पक्षाचा शिवसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आगामी विधान सभेच्या दृष्टीने हा मेळावा महत्वपूर्ण मानला जात आहे. या मेळाव्यात उध्दव ठाकरे यांनी शहरातील मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्प, शहरातील अवाढव्य वाढलेले शहरीकरण, विकास कामांचा उडालेला बोजवारा, पुण्यातील खड्ड्यांची समस्या यावर भाष्य करीत गेल्या काही दिवसांपूर्वी शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती, यावर राज्य सरकारला धारेवर धरीत अनेक गोष्टींचा पाढा वाचला. नदी सुधार करताना काही ठिकाणी नदीचा प्रवाह वळविण्यात आला, तर काही ठिकाणी बंद कऱण्यात आला. यामुळेच शहरातील अनेक भागांमध्ये पाणी शिरले, असा दावा त्यांनी बोलताना केला. यामुळे आता पुणेकरांनी रस्त्यावर उतरायला हवे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
बऱ्याच वर्षांनंतर पुण्यात येतोय. खरे म्हणजे जाहीर सभाच घ्यायची होती, पण ठीक आहे. आता लढाई मैदानात असेल, असे म्हणत मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही, कारण ढेकणं ही अंगठ्यांनी चिरडायची असतात. असे ते यावेळी म्हणाले. अयोध्येतील राम मंदीर गळतयं, नव्या संसद भवन देखील गळू लागल्याचे पाहिला मिळत आहे. नदी प्रकल्पाचे काम त्याच कॅान्टक्टरला दिले आहे. तोही गुजरातचा आहे, अशी माझी माहिती असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. तुमचं सगळचं गळतय? असा प्रश्न करीताच सभागृहात एकच हशा पिकल्यावर याचा वेगळा काही अर्थ घेऊ नका असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे ‘हे’ गळती सरकार आहे, १० वर्षांपूर्वीचे पुणे आणि आत्ताचे पुणे चांगल आहे का? असा प्रश्न केल्यावर उपस्थितांपैकी एकाने सांगितले की, पुणे आता खड्ड्यांचे शहर झाले आहे असे सांगितले.