शिरवळ : शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका धक्कादायक घटनेत, एका 21 वर्षीय तरुणीचा दोन लाख रुपये न दिल्याने गळफास घालून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती पत्नीला अटक केली आहे.
विशाल दिलीप बामणे आणि त्याची पत्नी हे दोघेही रा वडवाडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा असे आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी विशाल दिलीप बामणे आणि त्याची पत्नी हे दोघेही वडवाडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथील रहिवासी आहेत. त्यांनी 30 एप्रिल रोजी रात्री 9:30 वाजता फिर्यादी यांच्या घरी प्रवेश केला आणि तिला दोन लाख रुपये देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास, त्यांनी तिला धमकी दिली की ते तिचे विशाल यांना पाठवलेले मेसेज व्हायरल करतील.
धमकीनंतरही जेव्हा फिर्यादी यांनी पैसे दिले नाहीत तेव्हा दोघांनी तिच्यावर हल्ला केला. रेशमाने फिर्यादी यास नऊवारी साडीने गळफास घालून तिला बेडरूमच्या खोलीतील तुळईला अडकवन्याचा प्रयत्न करून खून करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिरवळ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एन.एस. कामठे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर पोलिसांनी त्वरित कारवाई करून दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्यावर हत्या करण्याचा प्रयत्न, खंडणी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.