उरुळी कांचन, (पुणे) : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी मला कोणत्याही प्रकारची अडचण नाही. राज्य शासनाच्या माध्यमातून मदत करण्यासाठी मी तत्पर आहे, असे प्रतिपादन दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केले. सोरतापवाडी (ता. हवेली) येथील सुदर्शन युवा मित्र मंडळ आयोजित ‘सोरतापवाडी गणेश फेस्टिवल’चे उद्घाटन आमदार राहुल कुल, आमदार रामभाऊ सातपुते, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्या प्रमूख उपस्थितीत झाले. या वेळी कुल बोलत होते.
या वेळी बाजार समितीचे उपसभापती रवींद्र कंद, संचालक प्रकाश जगताप, रोहिदास उंद्रे, राजाराम कांचन, प्रशांत काळभोर, नानासाहेब आबनावे, लक्ष्मण केसकर, मिलिंद हरगुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, संतोष कांचन, राहूल शेवाळे, तालुकाध्यक्ष शाम गावडे, पूनम चौधरी, प्रियांका चौधरी, सुहास चौधरी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.