भोरः कालच भोर-वेल्हा(राजगड)-मुळशी विधानसभेसाठी विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांनी चौथ्यांदा आपला उमेदवारी अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शन करीत दाखल केला आहे. यामुळे या विधानसभेसाठी महायुतीचा आमदार कोण? अशी विचारणा सातत्याने होत आहे. राजगड न्यूजला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार युतीकडून कुलदीप कोंडे (शिवसेना शिंदे) यांना उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे.? आज दुपारी या संदर्भात त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा थोपटे विरुद्ध कोंडे अशी लढत पाहिला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरणात या विधानसभेसाठी तिरंगी वा चौरंगी निवडणूक होणार असल्याची माहिती काही माध्यमांनी दिली होती. मात्र सर्वप्रथम राजगड न्यूजने येथील लढत ही दुरंगीच होणार असल्याची बातमी प्रसारित केली होती. यामुळे आता केवळ कोंडे यांच्या नावाची औपचारिक घोषणाच होणे बाकी आहे.