कामशेत/खेड/जुन्नर: या तालुक्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये तीन प्रकारच्या चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. कामशेत येथील एका मेडिकलमध्ये काम करीत असलेल्या कामगारानेच मेडीकलमधील औषधे लंपास केली आहेत. नाशिक मार्गाच्या बायपास काम चाललेल्या ठिकणी सेप्टी क्रॅश बॅरिअरचे पेसर चोरी गेली आहेत. तसेच जुन्नर तालुक्यातील गोळेगाव येथे घराच्या अंगाणातून दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
मावळ तालुक्यातील कामशेत येथील शिवाजी चौकात दि. ६ रोजी पाश्वनाथ मेडिकल अॅन्ड जनरल स्टोअर आहे. या मेडिकलमध्ये काम करीत असणाऱ्या कामगाराने मेडिकलमधील १२ हजार किंमतीची औषधांची चोरी केली आहे. या प्रकरणी मेडिकचे मालक गुलाबचंद पाखराज गादिया व्यंय ( वय ६३ रा. शिवाजी चौक, कामशेत) यांनी दुकानातील कामगार याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. आरोपीचे नाव भवरलाल जसराम चौधरी (वय ४४ सध्या रा. कामशेत ता. मावळ जि. पुणे) मूळ राहणार राजस्थान असे आहे. याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार शेख हे करीत आहेत
खेड तालुक्यातील तुकवाडी राक्षेवाडी दरम्यान पाबळरोड नाशिक महामार्ग येथील बायपासच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने बसविलेले सेप्टी क्रॅश बॅरिअरचे पेसर अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत. या प्रकरणी फिर्यादी दत्तात्रय प्रभाकर इंगोले (वय ३५ रा. मंचर ता. आंबेगाव जि. पुणे) यांनी पोलिसांनी फिर्याद दिली आहे. या प्रकणातील आरोपी अज्ञात आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. चोरी केलेल्या सेप्टी क्रॅश बॅरिअरचे पेसर अंदाजे रक्कम तैहतीस हजार आहे. पोलीस हवालदार कुडेकर तपास करीत आहेत
जुन्नर तालुक्यातील गोळेगाव येथील एका घराच्या अंगणातून दुचाकी चोरीला गेली आहे. या प्रकरणी भास्कर रामचंद्र लोखंडे (वय ५१) रा. गोळेगाव, ता. जुन्नर, पुणे यांनी पोलिसांना फिर्यादी दिली आहे. चोरीला गेलेली दुचाकी ही हिरो होंडा कंपनीची असून, अज्ञात चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत.