नसरापूर : पुणे सातारा महामार्गावर असलेल्या राजगड पोलीस स्टेशन मधून गुन्ह्यात असलेली गाडी चोरून नेताना पोलीस कर्मचाऱ्याने अडवले असता त्यालाच अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून तुषार अशोक धाडवे, वय 37 वर्षे, (रा. सारोळा, ता. भोर, जि. पुणे) याच्यावर राजगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगड पोलीस स्टेशनच्या आवारा मध्ये जप्त मुददेमालाच्या गाड्या लावलेल्या असतात. त्याच प्रमाणे एका गुन्हा मधील जप्त करून लावलेली पांढरे रंगाची ब्रेझा कार (नं MH.12 SL 5719) मध्ये तुषार अशोक धाडवे, वय 37 वर्षे, (रा. सारोळा, ता. भोर, जि. पुणे) हा कारचा दरवाजा उघडुन कार मध्ये बसताना कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचारी यांना दिसला त्याला आडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने गाडी रिव्हर्स मध्ये जोरात पळवुन गाडी पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली त्या गाडीचा धक्का लागुन दुखापत करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यानुसार तुषार अशोक धाडवे, वय 37 वर्षे, (रा. सारोळा, ता. भोर, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस कर्मचारी दिनेश देविदास गुंडगे वय 42 यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोसइ सुतनासे करीत आहेत.