Monday, November 2, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

नामांकित कंपनीचा कारनामा आला समोर; झाडांची कत्तल करुन झाडे रस्त्याखाली गाडली, वनविभागाची कंपनीला नोटीस

सणसवाडीतील नामांकित कंपनीतील प्रकार: वनविभागाच्या पाहणीत पितळ पडले उघडे

by SBPRNL
September 11, 2024
नामांकित कंपनीचा कारनामा आला समोर; झाडांची कत्तल करुन झाडे रस्त्याखाली गाडली, वनविभागाची कंपनीला नोटीस

शिक्रापूर/शेरखान शेख

सणसवाडी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी असलेल्या एका नामांकित कंपनीने काही झाडांची कत्तल करुन बारा देशी झाडे रस्त्याखाली गाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानुसार शिरुर वनविभागाने संबंधित कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या घटनेमुळे शिरुर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

You might also like

No Content Available

मिळालेल्या माहितीनुसार, सणसवाडी येथील प्रसिद्ध कंपनीने त्यांच्या हद्दीतील काही झाले तोडण्याची परवानगी वनविभागाकडे मागितली होती. त्यानुसार या प्रकरणी वनविभागाने जून २०२३ मध्ये पंचनामा करुन येथील ५१० झाडे तोडण्याची परवानगी देऊन लिंब, फिकस, नारळ यांसारख्या २३६ देशी झाडांचे पुनर्रोपण करण्याबाबत परवानगी दिली होती. त्याबाबत बंधपत्र सादर करुन घेतले होते. मात्र, कंपनीने काही झाडांचे पुनर्रोपण केले नसल्याचे समोर आले आहे.

कारवाईत धक्कादायक माहिली आली समोर 

तसेच काही झाडांवर पक्षांची घरटी, घरट्यामध्ये अंडी असल्याने या कंपनीवर वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आणल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी वनविभागाकडे करण्यात आल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह कंपनीमध्ये जाऊन पंचनामा करत पाहणी केली. या पाहणीमध्ये कंपनीने लिंबाच्या बारा झाडांची कत्तल करुन बारा देशी झाडे येथील रस्त्याखाली गाडल्याचे उघड झाले आहे. यामुळे कंपनीवर गुन्हा दाखल का करु नये, याबाबत कंपनीला कारणे दाखवा नोटीस वनविभागाच्या वतीने  बजावण्यात आली असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

या प्रकरणी कंपनीला नोटीस बजावून कारण दाखवण्यासाठी हजर राहण्याची वेळ देण्यात आल्यानंतर कंपनीचे नवीनच व्यक्ती हजर झाले होते. ज्यांना याबाबत काहीही माहिती नव्हती, त्यामुळे कंपनीला पुन्हा वेळ देऊन ज्यावेळी याबाबत परवानगी दिली. त्यावेळी असलेल्या लोकांनी उपस्थित राहण्याबाबत सांगण्यात आले आहे.

-प्रताप जगताप (वनपरिक्षेत्र अधिकारी)

Tags: forestrajgadnnewsshiruru
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

No Content Available
Next Post
गौरी गणपतीच्या सणालाः लोप पावत चाललेल्या घाणा संस्कृतीची आरास; जुन्या आठवणींना मिळाला उजाळा

गौरी गणपतीच्या सणालाः लोप पावत चाललेल्या घाणा संस्कृतीची आरास; जुन्या आठवणींना मिळाला उजाळा

ताज्या बातम्या

नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

November 1, 2026
PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

November 1, 2026
निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

November 1, 2026
अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

November 1, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. अधिकृत सूचनासाप्ताहिक भूमिश्री (RNI क्र. MHMAR/26/A4837) यांचे राजगड न्यूज लाईव्ह हे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. साप्ताहिक भूमिश्रीच्या वतीने डिजिटल वृत्तांकन व संबंधित अधिकृत कामकाजासाठी राजगड न्यूज लाईव्ह कार्यरत राहील. सर्व संबंधित अधिकारी व प्रशासनाने याची नोंद घ्यावी.कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group