ठाणे: येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एका ३५ वर्षीय तरुणाची निर्घूणपणे हत्या (thane murder case) करण्यात आल्याच्या घटनेमुळे मोठी खळबळ माजली होती. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरुणाची हत्या आईवरुन शिवी दिली हा राग मनात धरुन करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच आरोपीने क्राईम सीरिजमध्ये ज्या पद्धतीने हत्या करण्यात येते. आरोपी त्यासाठी कशा प्रकारे कट रचतात. हे पाहूनच या घटनेतील आरोपीने सोमनाथ सातगिरे या तरुणाची निर्घूणपणे हत्या करुन त्याचे मुंडक छाटून सोसायटीच्या टेरेसवर ठेवले होते. मयत सोमनाथ हा याच सोसायटीचा मुख्य सुरक्षा अधिकारी होता.
दोनच दिवसांपूर्वी ठाण्यात इमारतीच्या टेरेसवर मुंडकं छाटलेला मृतदेह आढळला होता. त्यामुळे एकच खळबळ माजली होती. आईवरून शिवी दिली म्हणून आरोपीने मुंडकं छाटून हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सोमनाथ यांनी प्रशांतला आईवरून शिवी दिली होती. याचा राग प्रशांतने मनात धरुन क्राईम सीरिजमध्ये जसा हत्येचा कट रचतात. तसा कट रचून सोमनाथची हत्या केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असून, घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे.