शिरुर: सध्याच्या युगात इंटरनेटमुळे मुलांना विविध विषयांचे ज्ञान उपलब्ध होत आहे. परंतु मोबाईलमुळेच आजचे विद्यार्थी भरकटत चालले आहेत. पूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षकांची आदरयुक्त भिती वाटत होती. परंतु आत्ता तशी परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच चारित्र्यवान बनविने हे सध्या शिक्षकांपुढे मोठे आव्हान असल्याचे मत शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी व्यक्त केले. करडे (ता. शिरुर) येथील भैरवनाथ विद्यालयात शिक्षकदिनानिमित्त रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशांत ढोले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ढोले यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख वक्ते शंकर महाराज गणगे बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर एखादं ध्येय साध्य करायच असेल, तर तुम्हाला त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल. पूर्वीच्या काळात शिक्षकांना मास्तर म्हणायचे कारण जो जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी धडपड करतो तो मास्तर असतो. तसेच प्रत्येकाचा व्यक्तिमत्व विकास हा मराठी शाळेतच होत असल्याचेही यावेळी गणगे यांनी सांगितले.
यावेळी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने वर्षा निलेश पवार (उपशिक्षिका, भैरवनाथ विद्यालय, करडे), संतोष बबनराव थोपटे, (जि प शाळा, घावटे मळा), प्रतिभा दत्तात्रय आबुज (जि प शाळा, कर्डेलवाडी), स्वाती शरद निंबाळकर (जि प शाळा, आंबळे), कुमुदिनी खंडू बोराडे (जि प शाळा, पाषानमळा, शिरुर) या सर्व शिक्षकांना शैक्षणिक क्षेत्रात काम केल्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ देऊन गौरविण्यात आले.
रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, शिरुर खरेदी विक्री संघाचे संचालक सुरेश पाचर्णे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष शामकांत वर्पे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिरुर शहर युवती अध्यक्षा गीता आढाव, सरदवाडीचे ग्रामपंचायत सदस्य कृष्णा घावटे, पत्रकार अरुणकुमार मोटे, सुभाष गोरे, राणी शिंदे, दिपाली आंबरे, अश्विनी जाधव, दुर्गा ननवरे, अश्विनी संकपाळ, भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र पवळ, पर्यवेक्षक विलास चासकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास चासकर, सुत्रसंचालन अनिल गावडे तर आभार वर्षा पवार यांनी मानले.