पुणे/भोर – वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कोंढवा बुद्रुक पुणे यांच्याकडुन गुरूवार (दि.४) शिक्षक दिनाच्या निमित्ताने आदर्गुश गुणवंत मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी बोलताना कारेकर यांनी आजच्या युगात शिक्षकाने अद्यावत राहणे ही काळाची गरज असून नवनवीन तंत्रज्ञानाचा, उपक्रमांचा उपयोग शिक्षणात केला पाहिजे व विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देऊन अद्यवायत उपक्रमशील ठेवले पाहिजे असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी पश्चिम महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष जालिंदर कामठे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते कुंडलिक मेमाणे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते नंदकुमार सागर, सुधाकर जगदाळे, सरपंच शोभा दळवी, तानाजी घारे, सुनील लोणकर, दीपक फडतरे, दीपाश्री वाणी, भानू काका जगताप, सचिन पठारे रामभाऊ झेंडे संजय धुमाळ संदीप देवकर, भैय्यासाहेब खैरे व इतर मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कार प्रसंगी अशोक रामा चव्हाण मुख्याध्यापक कोळविहिरे , सतीश रामदास कुमदाळे कातोबा हायस्कूल दिवे, श्रीमंत देशराज यादव सद्गुरु नारायण महाराज माध्यमिक विद्यालय नारायणपूर, भानुदास मारुती कटके पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सासवड, दत्तात्रय बाबुराव वायसे राजुरी माध्यमिक विद्यालय राजुरी, प्रशांत रमेश जगताप न्यू इंग्लिश स्कूल जेऊर, सुनंदा मोरेश्वर टकले केदारेश्वर विद्यालय काळदरी ,मनोज कुमार दौलतराव कदम बाल सिद्धनाथ विद्यालय बेलसर, अश्विनी समीर कामठे वाघिरे हायस्कूल सासवड, शबाना हसन मण्यार ज्योतिर्लिंग हायस्कूल गुळूंचे ,सुदाम ज्ञानदेव गायकवाड महर्षी वाल्मिकी विद्यालय वाल्हे, प्रशांत धोंडीबा धेडे निवासी हायस्कूल ,दत्तात्रय एकनाथ पवार नीरा शाळा नंबर एक ,रवींद्र तुकाराम कुंजीर हिवरे शाळा ,छाया नामदेव कारकर शाळा माहूर ,संजय वामनराव धुमाळ तोंडल, वर्षा प्रशांत माकर धनगर शाळा वाल्हे ,सुवर्णा गोरख खेडकर मावडी सुपे, मोहनलाल ज्ञानेश्वर निगडे न्यू इंग्लिश स्कूल जवळार्जुन उत्तम गेनबा लकडे कृषी औद्योगिक विद्यालय चांबळी, अण्णा सांगाप्पा लोंढे भैरवनाथ विद्यालय वनपुरी, नितीन किसन काळे विद्या महामंडळ प्रशाला कोथळे या 22 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास भोसले यांनी केले, व आभार दत्तात्रय गायकवाड यांनी मानले.