भोर – पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे, भोर तालुका विधी समिती, भोर, व भोर वकिल संघटना, भोर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उत्राैली मध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना कायदेवषियक मार्गदर्शन करण्यात आले. सदर कायदेविषयक व्याख्यानमालेमध्ये भोर दिवाणी न्यायालयाच्या २ रे सह न्यायाधीश शशांक शिरसाट यांनी उपस्थीत विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (बालकांसाठी बालस्नेही विधी सेवा व त्यांचे संरक्षण) योजना -२०२४ संदर्भात ओळख करुन दिली. विधीज्ञ ॲड विजय दामगुडे यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (बालकांसाठी बालस्नेही विधी सेवा व त्यांचे संरक्षण) योजना -२०२४ संदर्भातील विस्तृत कायदेविषयक माहीती दिली. त्यांनतर ॲड शिवाजी पांगारे यांनी पोक्सो कायद्या संदर्भातील विस्तृत कायदेविषयक माहीती दिली तसेच भोर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड संतोष बाठे यांनी बालकांचे हक्क याबाबत कायदेविषयक माहिती दिली. सदर कायदेविषयक कार्यक्रमाचा लाभ २१९ विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विठ्ठल दानवले यांनी केले व आभार प्रदर्शन रवींद्र येडवे यांनी केले. सदर कार्यक्रमास मुख्याध्यापक सविता चोरघे व इतर शिक्षक संगीता पापळ, अनिता सुतार, अनिता लोखंडे, वैशाली चिंचकर, अश्विनी पवार, अमर उभे, स्मिता बोराडे, राजेंद्र गुरव,आफ्रिन तांबोळी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश शिवतरे, सागर कुंभार, अशोक शेटे, विजय शिवतरे , प्रसाद शिंदे, राजेंद्र शेटे ,कांताराम शिवतरे, दत्तात्रय शिवतरे, तसेच न्यायालयीन कर्मचारी कैलास आखाडे ,राजेंद्र मुगडे उपस्थीत होते. .

















