नसरापूर : सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना व नवसह्याद्री एज्युकेशन सोसायटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग, नायगाव, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने मु. गुनंद ता. भोर जि. पुणे येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर २० जानेवारी २०२४ ते २६ जानेवारी २०२४ पर्यंत घेण्यात येणार असून, या शिबिरात विविध कार्यक्रम जसे की वृक्षारोपण करणे, अक्षय ऊर्जा वापराबाबत जनजागृती करणे, सामाजिक सुसंवाद निर्माण करणे, राष्ट्रीय एकात्मता फेरी काढणे, शिव-व्याख्यान याचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष शिबिराची सुरुवात गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील तथा सर्व ग्रामस्थ मंडळी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी नवसह्याद्री एज्युकेशन सोसायटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स फॅकल्टी ऑफ इंजीनियरिंगचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच या विशेष शिबिराचे आयोजन का करण्यात आलेले आहे याचे महत्त्व विद्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थांना सांगितले.
तसेच संस्थेचे अध्यक्ष पोपटराव सुके, संचालक सागर सुके, संचालिका प्रा. सायली सुके, प्रा. सानवी सुके यांनी या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन रासेयो अधिकारी प्रा.सागर चव्हाण यांनी केले तसेच ओंकार देशमुख यांनी विशेष सहकार्य केले.