सारोळा : विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून न्हावी गावात एक स्तुत्य उपक्रम पार पडला. जूनो सॉफ्टवेअर कंपनी, हडपसर यांच्या सीएसआर निधीतून न्हावी गावातील २०० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि दप्तरांचे वाटप करण्यात आले.
जूनो ही कंपनी विद्यापीठ प्रवेश प्रक्रियेचे सुलभीकरण करणारे सॉफ्टवेअर तयार करते. समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत शैक्षणिक सुविधा पोहोचवण्याच्या उद्देशाने या कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम हाती घेतला. सदर उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मे रणजीत हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस यांचे विशेष सहकार्य लाभले.
याच कार्यक्रमात, जि. प. प्राथमिक शाळा न्हावी येथे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चार संतरंज्यांचे वाटप गोपाळ शंकरराव सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमोदभाऊ सोनवणे, शैलेशदादा सोनवणे, शीतलताई सोनवणे, अनिल आप्पा सोनवणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असून, समाजाने एकत्र येऊन शिक्षणासाठी काम केले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शैलेशदादा सोनवणे, पत्रकार जीवन सोनवणे, शीतलताई सोनवणे, पल्लवीताई सोनवणे, दत्तात्रय कारळे, अनिल आप्पा सोनवणे, कुमार सोनवणे, सुधाकर सोनवणे, मोहन चव्हाण, आप्पा गायकवाड, गणेश सोनवणे, अनिकेत भोसले, विजय सोनवणे, तात्या खुटवड, शशिकांत चव्हाण, अमोल शिवणकर, अनिल सोनवणे, नितीन सोनवणे, अविनाश भोसले, मिलिंद सोनवणे, गणेशतात्या सोनवणे, निलेशदादा सोनवणे, भरत सोनवणे, सोनाली बोन्द्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपाली पिसाळ यांनी केले. सूत्रसंचालन अनिल चाचर यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप मोरे यांनी मानले.