भोरः कै. काशिनाथराव खुटवड माध्यमिक विद्यालय हातवे येथील 2004 च्या बॅचचा स्नेहमेळावा पार पडला. या स्नेहमेळाव्यात 30 विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमात विद्यालयातील खुटवड आणि सोंडकर या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. सचिन भिलारे या माजी विद्यार्थी यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी विजया शेलार या विरपत्नीचा सत्कार करण्यात आला. तसेच सागर थिटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांकडून शाळेला 10 खुर्च्या भेट म्हणून देण्यात आल्या. 20 वर्षानंतर ज्या शाळेत हे माजी विद्यार्थी शिकले, त्यांना शाळेतील जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. स्नेहभोजनच्या कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर पुन्हा भेटण्याचा निश्चय करून सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.
यावेळी निलेश जुगधर, अमृत पांगारकर, भरत पांगारकर, प्रदीप भिलारे, प्रमोद भिलारे, निलेश भिलारे, अमित भिलारे, दत्तात्रय ढमाळ, शंकर वाघ, समीर रसाळ, उमेश खुटवड, सुनिल खुटवड, राहुल बांदल, शंकर पांगारकर, रोहित लेकावळे, सागर सणस तसेच प्रियांका जामदार, भिमा शेलार, शोभा धनावडे, अश्विनी थिटे, विजया शेलार, नकुशा किंगरे, जयश्री मुजुमले सविता खुटवड, विद्या जामदार या मुलींनी सहभाग नोंदवला.