भोरः आघाडीचे आणि पर्यायाने काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संग्राम थोपटे हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आजच भव्य सभेचे आयोजन करून त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी आघाडीतील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. या भाषणामधून त्यांनी संग्राम थोपटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे जाहीर केले. भोर शहरात भव्य रॅलीचे आयोजन करून थोपटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी थोपटे समर्थकांसह आघाडीतील घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे असताना महायुतीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा न झाल्याने येथे विविध चर्चांना उधाण आल्याचे पाहिला मिळत आहे.
आघाडीचे उमेदवार हे संग्राम थोपटे असतील असे जवळपास निश्चितच झाले होते. आज त्यांनी उमेदवारी अर्ज भरून ते दाखवून दिले आहे. मात्र महायुतीकडून अद्यापर्यंत कोणाच्याही नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे काही दिवसांपूर्वी आयोजित युतीच्या पत्रकार परिषदेमध्ये दोनच दिवसांमध्ये युतीच्या उमेवाराच्या नावाची घोषणा केली जाईल असे सांगण्यात आले होते. अजनूही युतीकडून अधिृत उमेवाराच्या नावाची घोषणा झाली नसल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे आता युतीचा उमेदवाराच्या नावाची घोषणा कधी होणार हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे.