शिरवळ :- शिरवळ ता खंडाळा गावचे हद्दीत असणाऱ्या इन्टेक्स ट्रान्सपोस्टेशन सव्हिर्सेस प्रा.लि. या कपंनीच्या शिरवळ येथील कार्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या कामगार व चालकाकडून १२ लाख २० हजार ९५९ रुपयाचे मोबाईलसह इतर साहित्य लंपास केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानुसार कारवाई करत शिरवळ पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,शिरवळ ता खंडाळा गावचे हद्दीत असणाऱ्या इन्टेक्स ट्रान्सपोस्टेशन सव्हिर्सेस प्रा.लि. या कपंनीच्या शिरवळ येथील कार्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या कामगार व चालकाकडून १२ लाख २० हजार ९५९ रुपयाचे मोबाईलसह इतर साहित्य लंपास केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस , यांनी सदरील गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना शिरवळ पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप व शिरवळ गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार शिरवळ पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपुर्ण तपास करीत सदरील गुन्हा उघडकीस आणत यामधील मुख्य सुत्रधार कार्यालयीन कर्मचारी श्रीकांत विनोद घनवट वय २२ वर्षे रा. मु.पो. राजापूर ता खटाव जि. सातारा वाहन चालक राजेंद्र लक्ष्मण सांगळे वय ३९ वर्षे रा. कहेवाडी ता कहॅवडगाव ता आष्टी जि. बीड यांना ताब्यात घेत संबंधीतांकडून १२ लाख २० हजार ९५९ रुपयांच्या मुद्देमाल पैकी ४१ मोबाईल फोन हस्तगत करत ६ लाख ७० हजार ३८६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये मुख्य सुत्रधारासहित गुन्हामध्ये शिरवळ पोलीसांनी दोघांना अटक केली आहे. सदर कारवाईमध्ये सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल साो, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे, पोलीस अंमलदार संजय धुमाळ, सचिन वीर, जितेंद्र शिंदे, तुषार कुंभार, प्रशांत धुमाळ, मंगेश मोझर, सुरज चव्हाण यांनी सहभाग घेतला आहे. सदरचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल सहभागी सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधिक्षक, राहुल धस फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.