Sunday, June 7, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

शिरुरः पोलीस ठाण्याच्या आवारातच महिलेला अंगावर डिझेल ओतून घेण्याची वेळ का आली?

तालुक्यातील पोलीस ठाण्यात सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याचा नागरिकांचा आरोप

by Team Rajgad Publication
August 23, 2024
शिरुरः पोलीस ठाण्याच्या आवारातच महिलेला अंगावर डिझेल ओतून घेण्याची वेळ का आली?

शिरूर: पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये एका महिलेने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घराशेजारील शाळेत रात्रीच्या वेळेस डीजेचा आवाज येत असल्याने व त्याचा आपल्या मुलांच्या अभ्यासात अडथळा येत असल्याने त्याचा जाब विचारायला गेलेल्या महिलेला व तिच्या तरूण मुलाला शाळेत शिवीगाळ करून, धमकावल्या प्रकरणी शिरूर पोलिसांनी शाळेतील शिक्षकांसह १५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. धक्कादायक बाब म्हणजे शाळेतील शिक्षक दारूच्या नशेत होते, असा आरोप फिर्यादी महिलेने केल्याने व तक्रार दाखल करण्यास पोलीस मदत करत नसल्याने पोलीस ठाण्यासमोर अंगावर रॉकेल ओतून घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एका ४४ वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून सुरेश चौगुले व अभिषेक जाधव यांच्यासह १५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

……असा घडला संपूर्ण प्रकार 

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी यांच्या घराजवळ सेंट जोसेफ इंग्लिश मिडिअम स्कूल आहे. दोन महिन्यांपूर्वी (२० जून) रात्रीच्या वेळेस शाळेत डीजे सुरु होता. फिर्यादी यांची मुले युपीएससीचा अभ्यास करीत असल्याने अडथळा आला म्हणून त्या मुलगा जीवन साळवे याच्यासह शाळेत जाब विचारण्यास व डीजेचा आवाज कमी करा म्हणून सांगण्यास गेल्या असता तेथे दहा-बारा जण दारूच्या नशेत आढळून आले. हा प्रकार शाळेच्या मुख्याध्यापकांना दाखवावा म्हणून त्या आपल्या मोबाईलद्वारे या प्रकाराचा व्हिडिओ काढीत असतानाच तिथे मुख्याध्यापिका नॅन्सी पायस या दोन महिलांसह आल्या व त्यांनी फिर्यादीला तु व्हिडिओ का काढते, असा जाब विचारला. तेव्हा डीजेचा आवाज कमी करा, असे सांगण्यासाठी मी आले होते असे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता तु कोण असे म्हणत त्यांनी हिला धरून ठेवा मी पोलिसांना बोलावते असे धमकावत दमदाटी केली. ते सगळे दारूच्या नशेत दिसल्याने फिर्यादी यांनी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला असता, एका महिलेने त्यांना लाथ मारली व मोबाईल घेतला. तसेच मुलगा जीवन साळवे याला सुरेश चौगुले याने धक्काबुक्की केली. त्यानंतरही चौगुले व जाधव यांनी फिर्यादीच्या मुलाला शिवीगाळ करून जीव मारण्याची धमकी दिली. तुम्ही आमचे काहीच बिघडवू शकत नाही, म्हणत वेळोवेळी त्रास दिल्याने साळवे यांनी शिरूर पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले हे करीत आहेत.

म्हणून पोलीस ठाण्याच्या आवारात स्वःताच्या अंगावर डिझेल ओतून घेतले

दरम्यान, काही दिवसांपूर्वी फिर्यादी महिला यांचा मुलगा जीवन याच्यासह बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचे पती सखाराम साळवे यांनी दिली होती. शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्रास दिल्याने निघून जात असल्याचा मेसेज त्यांनी पतीच्या मोबाईलवर पाठविल्यानंतर पोलिसांनी त्याबाबत मिसिंग नोंदवली होती. बुधवारी सायंकाळी साळवे यांनी शिरूर पोलीस ठाण्यासमोरच अंगावर डिझेल ओतून घेतल्याने खळबळ उडाली. बुधवारी रात्री उशिरा त्यांच्या फिर्यादीवरून सेंट जोसेफ शाळेतील शिक्षक जाधव, मदतनीस चौगुले यांच्यासह १५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तालुक्यातील पोलीस ठाण्यात सन्मानजक वागणूक मिळत नसल्याचा नागरिकांचा आरोप

शिरूर तालुक्यातील पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांना सन्मान जनक वागणूक मिळत नसल्याने अनेक वेळा नागरिकांना पोलिसांच्या विरोधात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे कार्यालय गाठावे लागत आहे. तर तेथे निवेदन देऊन, काही वेळा आंदोलन देखील करावी लागत आहे. तर कधी महिलेला अंगावर डिझेल ओतून घेऊन टोकाचे पाऊल उचलण्यासाठी भाग पडत आहे, त्यानंतर कुठे तक्रारदाराची दाखल घेतली जात आहे. या प्रकारामुळे शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, रांजणगाव, शिरूर पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याबाबत आता पुणे पोलीस ग्रामीण अधीक्षक पंकज देशमुख यांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मागणी आहे.

Tags: pankajdeshmukhrajgadnewsshirurpolice
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
भोरः तालुक्यातील 3000 भाविकांना घडविणार तीर्थक्षेत्र काशी विश्वनाथाचे दर्शनः 31 ऑगस्टला यात्रा पुण्याहून रेल्वेने मार्गस्थ होणार

भोरः तालुक्यातील 3000 भाविकांना घडविणार तीर्थक्षेत्र काशी विश्वनाथाचे दर्शनः 31 ऑगस्टला यात्रा पुण्याहून रेल्वेने मार्गस्थ होणार

ताज्या बातम्या

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group