Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

साताराः ‘हनी ट्रॅप’च्या जाळात ओढून शिजला सशस्त्र दरोड्याचा कट; २ कोटी ७९ लाख ३४ हजारांची रक्कम पोलिसांनी केली हस्तगत, आरोपींच्या आवळल्या मुसक्या

प्रकरणातील रक्कम ३ कोटीः ईडी, इन्कमटॅक्स विभागही करणार तपास

by SBPRNL
October 20, 2024
साताराः ‘हनी ट्रॅप’च्या जाळात ओढून शिजला सशस्त्र दरोड्याचा कट; २ कोटी ७९ लाख ३४ हजारांची रक्कम पोलिसांनी केली हस्तगत, आरोपींच्या आवळल्या मुसक्या

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

साताराः पुणे- बंगळुरू महामार्गावर कराडजवळ मंगळवारी रात्री टाकण्यात आलेल्या सशस्त्र दरोड्यातील तीन कोटींपैकी २ कोटी ८९ लाख ३४ हजारांची रक्कम स्थानिक गुन्हे शाखा व कराड शहर पोलिसांनी हस्तगत केली आहे. दरोड्यासाठी दोन महिने संबंधित टोळीने रेकी केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच फिर्यादी चालक शैलेश घाडगे व बदली चालक अविनाश घाडगे या दोघांवरही गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबईहून कर्नाटकाला हवालाची तीन कोटींची रक्कम पोहोचवण्यासाठी निघालेल्या मोटारगाडी चालकाला ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात ओढून हा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच समाज माध्यामातून संपर्कात आलेल्या महिलेने चालकाचे ‘लोकेशन’ शोधले आणि ‘हनी ट्रॅप’मुळे चालक गुन्ह्यात अडकल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. या प्रकरणातील अनेक धागेदोरे यांचा तपास पोलीस आणि गुन्हे शाखा करीत आहेत. या प्रकरणात कराडच्या कुख्यात गुंडाचाही सहभाग असल्याची माहिती मिळत आहे. संबंधित गुंड व आणखी एक इसम फरार आहे. हे दोघेही लवकरच हाती येतील, असा विश्वास पोलिसांना आहे.

प्रकरण काय आहे? 

संशयित महिलेची समाज माध्यमावर चालक घाडगे याच्याशी ओळख होऊन त्यांच्यात संवाद होत होता. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्यात व्हिडिओच्या माध्यमातून संवाद झाला होता. त्यावेळी त्याने हवालाचे पैसे पोहोचवण्यासाठी निघालेले वाहन दाखवले. ही माहिती त्या महिलेने तिच्या ओळखीच्या मांगलेकरला दिली. त्याने ही माहिती मुख्य सूत्रधारास दिली आणि लुटीचा कट शिजवण्यात आला. दोन्ही कार चालकांना लुटीतीलच १७ लाखांची रक्कम देण्यासह खोटी फिर्याद देण्यास सांगण्यात आले. मात्र, फिर्यादीच्या माहितीत विसंगती आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित महिलेसह १० जण गजाआड

अजमेर मोहमंद मांगलेकर (३६, रा. गोळेश्वर- कराड), नजर मोहमंद आरीफ मुल्ला (३३, रा. रविवार पेठ, कराड) करीम अजीज शेख (३५, रा. मंगळवार पेठ, कराड), नजीर बालेखान मुल्ला (३३, रा. सैदापूर) यांच्यासह रक्कम घेऊन निघालेल्या मोटारगाडीचे चालक शैलेश शिवाजी घाडगे (२४) व अविनाश संजय घाडगे (२१, दोघेही रा. निमसोड, ता. खटाव), ऋतुराज धनाजी खडंग (२१), त्याचा भाऊ ऋषिकेश (२६) तसेच अक्षय अशोक शिंदे (२१, तिघेही रा. तांबवे, ता. कराड) आणि कराडच्या मंगळवार पेठेतील संशयित महिला अशांना अटक झाली आहे.

 ईडी व इन्कम टॅक्स विभागही तपास करणार

संबंधित प्रकरणातील हवालाची रक्कम ही मोठी आहे. ही रक्कम कोणाला द्यायची होती, कुठे पोहचवायची होती. असे अनेक प्रश्न निर्माण झाल्याने मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे आता या प्रकरणातील रक्कमेची खातरजमा करण्यासाठी सक्त वसुली संचालनालय व प्राप्तिकल विभागाला कळवले असून, यासह अन्य संबंधित विभाग या रोकड संदर्भात विशेष तपास करणार आहेत.

Tags: karadpunesatarahighwayrajgadnewssataracrimenews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
वीरमरणः छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत बावडा गावाचे सुपुत्र अमर शामराव पवार शहीद

वीरमरणः छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत बावडा गावाचे सुपुत्र अमर शामराव पवार शहीद

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group