भोरः कालच एका उमेदावाराची सांगता सभा पार पडली. या सभेत गरळ ओकण्याचा प्रयत्न झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळेला या सभेच्या माध्यमातून मतदार संघात बदल घडवा, असे आवाहन इथल्या मतदारांना केले. मात्र, नेहमीप्रमाणे अजितदादांच्या बोलण्याला धार नव्हती आणि चेहऱ्यावरती तेज देखील नव्हते. खरंतर त्यांच्या चेहऱ्यावरती बारामतीची चिंता असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या मतदार संघाचे नेतृत्व निष्क्रिय, दिशाभूल आणि फसवणूक करणारे असल्याचे ते यावेळी बोलले. मात्र, निष्ठावान, फसवणूक हे सारे शब्द तुम्हाला लागू होत असल्याचे प्रतिउत्तर आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी भोर, कापूरव्होळ आणि हरिश्चंद्र येथे सांगता सभा पार पडली यावेळी आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे बोलत होते.
भोर एमआयडीसी, राजगड सहकारी कारखाना आदी गोष्टींबद्दल ते बोलले. तसेच लोकप्रतिनिधीच्या अंगात पाणी असायला लागते. मतदारसंघातील नागरिक त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल थोपटे यांनी यावेळी बोलताना केला. स्वःताच्या सत्तेसाठी कोण पक्ष बदलून गेले. खरंतर या वयात सोहबांना आधार द्यायला हवा होता. तसेच बहिणीची पाठीशी उभे राहिला हवे होते. मात्र, तुम्ही बहिणीला विरोध करण्याचे काम केले. राजगड सहकारी कारखान्यासाठी अनेकवेळा मागणी केली. मंंजूर झालेले कर्ज थांबविण्याचे काम तुम्ही केले. असा हल्लाबोल यावेळी थोपटे यांनी अजित पवार यांच्यावर केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, संत तुकाराम कारखान्याचे चेअरमन मा. खा. नानासाहेब नवले, मा. खा. अशोक मोहोळ, मानसिंगराव धुमाळ, रविंद्र बांदल, माऊली शिंदे, हनुमंतराव कंक, शरद जाधव, शैलेश सोनवणे, गीतांजली शेटे, संतोष रेणुसे, दुर्गा चोरगे, प्रमोद लोकरे आदी महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सगळंच तुम्हीच केलं तर मग विकास झाला नाही असं का म्हणताः थोपटे
काल त्यांनी सभेच्या माध्यमातून भोरच्या विकासाबाबत टीका टिप्पणी केली. भोर कापूरव्होळ रस्ता केल्याचे ते बोलले, पण मी त्यांना सांगू इच्छुतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात त्या रस्त्याचे काम झाले झाले असल्याचे थोपटे यावेळी म्हणाले. मग विकास झाला असे का म्हणता असा सवाल थोपटे यांनी अजित पवार यांना केला.