राज्य परिवहन महामंडळाकडील (एस.टी) कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेकडून बेमुदत उपोषणाचा इशारा राज्य शासनाला दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता मिळावा. घरभाडे, वार्षिक वेतनवाढ यासह फरक कर्मचाऱ्यांना मिळावा. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा आणि ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी येत्या ११ सप्टेंबरपासून मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहे. (ST News) त्याबाबत संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
दरम्यान, दोन दिवसांत राज्य शासनाने दखल घेतली नाही, (ST News) तर १३ सप्टेंबरपासून राज्यातील सर्व जिल्हा पातळीवर बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.