भोर : लाडक्या गणरायाच्या आगमन उद्या होत असल्याने पूजेचे साहित्य खरेदीसाठी आज भोरच्या बाजारपेठेत भाविकांची लगबग पहायला मिळत आहे. पूजेच्या साहित्यात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा वाढ झाली असून महागाईचा फटका ग्राहकांना बसत असल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात आले.
गणेशाच्या पूजेसाठी एसटी स्टँड पासून ,मंगळवार पेठ ,नगरपालिका चौक ,तसेच चौपाटी आजूबाजूच्या परिसरात हळदी कुंकवाची मोठं मोठी दुकाने आहेत या दुकानांमधून पूजेसाठी आवश्यक असलेले हळद, कुंकू ,शेंदूर ,अष्टगंध, रांगोळी ,गुलाल, अत्तर , धूप, अगरबत्ती , समई , निरंजने , वाती , फुलवाती, कापूर, खारीक बदाम , हळकुंड ,सुपारी ,पंचखाद्य ,गुळ, खोबरे आधी वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसत आहे.
कापूर डबी, आसन उपरणे, शेंदूर ,अष्टगंध ,आरती पुस्तिका, उदबत्ती, रंगबिरंगी रांगोळी ,गणरायाच्या माळी, फुले, लाईटच्या माळी, हार ,फुल, तसेच पूजेसाठी लागणारी विविध प्रकारची फळे, फुलोरा , विविध मिठाईची दुकाने अशा सर्व दुकानांनी बाजारपेठ सजली आहे. तसेच गौरी गणपती मुखवटे, स्टॅन्ड, गौरी गणपती सजावट मंडप यांचे दुकाने मोठ्या प्रमाणात लागली आहेत
मागील दोन-तीन दिवसापासून पावसाचे रिपरिप सुरू असल्याने ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवली होती परंतु आज सकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.
नगरपालिका ते एसटी स्टँड पर्यंतचा रस्ता गर्दीने फुलून गेला आहे तसेच गर्दी झाल्याने वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण होत आहे. पोलीस प्रशासन हे वारंवार वाहतूक मोकळी करण्यासाठी प्रयत्नशील आहे .परंतु छोट्या कार. दूचाकी यांचे प्रचंड प्रमाण वाढल्याने दुचाकीधारक बेधडक पेठेतील गर्दीत गाडी घुसवून, रस्त्यांवर दुचाकी लावुन वाहतूक अडथळा निर्माण करत आहेत.
उद्या गणरायाचे आगमन होणार असल्याने पेठेत मोठी गर्दी होण्याची शक्यता या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाने दखल घेत दुचाकी धारक ,कारचालक यांचे वाहन पेठेच्या रस्त्याला येणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे असे नागरिकांकडून बोलले जात आहे.