पुणेः भाजपच्या पहिल्या ९९ उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर पर्वती विधानसभा मतदार संंघातून माधुरी मिसाळ यांना पुन्हा एकदा निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आहे. यामुळे याच मतदार संघातून पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे मा. अध्यक्ष श्रीनाथ भिमाले हे इच्छुक होते. मात्र, भाजपने पुन्हा एकदा माधुरी मिसाळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने भिमाले हे नाराज झाले असून, येत्या दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे पक्षातील बडे नेते त्यांची मनधरणी करण्यात यशस्वी होतात का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास तयारी केली असल्याचे म्हणत १५ वर्षांपासून मागणी करीत आहे. तसेच हा मतदार संघ पिंजून काढला आहे. पार्टीने जो काही निर्णय घेतलाय आता कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून मी माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मी ज्यावेळी लढणार आणि जिंकणार ही टॅगलाईन घेऊन आला, त्याच वेळी मी ठरवले होते की लढणार आणि जिंकणार असे ते म्हणाले.