शिक्रापूर: प्रतिनिधी शेरखान शेख
रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील पुणे-नगर महामार्गावर दुचाकीला कारची धडक बसून झालेल्या अपघातात राहुल बाळासाहेब काशीकर हा युवक ठार झाला आहे. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील पुणे-नगर महामार्गावरून राहुल काशीकर हा युवक त्याच्या दुचाकीहून चाललेला असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कारची राहुलच्या दुचाकीला जोराची धडक बसली. राहुल रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला, दरम्यान कार चालकाने घटना स्थळाहून पळून काढला. मात्र झालेल्या अपघातात राहुल बाबासाहेब काशीकर वय २४ वर्षे सध्या रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. उंबरी ता. केज जि. बीड या युवकाचा मृत्यू झाला.
याबाबत अमोल बाबासाहेब काशीकर वय ३० वर्षे सध्या रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. उंबरी ता. केज जि. बीड यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून, अज्ञात कार चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती पासलकर हे करीत आहेत.