दत्तात्रय कोंडे: राजगड न्युज
हवेली : राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दिवसा बंद घराचे कडी-कोयंडा तोडून घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
६ लाख ६४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
अतुल ऊर्फ अठ्या चंद्रकांत आमले (वय – २८, रा. आकाशनगर, अशोक गोडांबे, वारजे, यांचे खोलीत, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ६ लाख ६४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशी माहिती स्थनिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली आहे.
पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात राजगड व हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपार्टमेंट मधील बंद सदनिकांमध्ये दिवसा घरफोडी चोरीचे प्रमाणे वाढले होते. या घटनेच्या अनुषंगाने वरीष्ठांनी स्थनिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, राजगड व हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोऱ्या या सप्टेंबरच्या पहिल्या आठवडयात जामीनावर बाहेर आलेला सराईत गुन्हेगार अतुल ऊर्फ अठ्या आमले याने केल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी त्याला खडकवासला परीसरातील धरण चौकाजवळ सापळा रचून ताब्यात घेतले.
दरम्यान, त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव वरीलप्रमाणे सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने खेड शिवापूर, नांदेडगाव, डोणजे, हिंजवडी परीसरात घरफोडी व चोरीचे ९ गुन्हे केले असल्याचे पोलिसांना सांगितले. त्याच्याकडून पोलिसांनी ६ लाख ६४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली अॅक्टीव्हा मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे. आरोपी अतुल आमले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर कोथरूड, वारजे, दत्तवाडी, अलिबाग, रावेत पोलीस ठाण्यात २३ गुन्हे दाखल आहेत
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, हवेली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, राजू मोमीण, अतुल डेरे, चंद्रकात जाधव, मंगेश थिगळे, अमोल शेडगे, तुषार भोईटे, धिरज जाधव, मंगेश भगत, प्राण येवले, हेमंत विरोळे, दत्ता तांबे, समाधान नाईकनवरे, बाळासाहेब खडके, अक्षय सुपे, राजगड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ, पोलीस नाईक सोमनाथ जाधव, हवेली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार यांनी केली असून पुढील तपास हवेली पोलीस स्टेशन करत आहे.