Wednesday, June 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

राजगडः ‘त्या’ खूनाचा झाला उलघडा: ‘तो’ देवऋषी होता, त्याने माझ्यावर करणी केली; ‘तो’ खून अंद्धश्रेद्धतूनच: आरोपीची कबुली

वेगवान गतीने तपासाची चक्रे पोलिसांनी फिरवली, खेड शिवापूरमधून आरोपीला घेतले ताब्यात; अंद्धश्रद्धा नडली आणि क्षणात हातून होत्याच नव्हत झालं

by SBPRNL
September 26, 2024
राजगडः ‘त्या’ खूनाचा झाला उलघडा: ‘तो’ देवऋषी होता, त्याने माझ्यावर करणी केली; ‘तो’ खून अंद्धश्रेद्धतूनच: आरोपीची कबुली

राजगडः गुंजवणी नदीच्या पुलाजवळील नदीपत्रात एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. घटनास्थळावरुन बनाव करुन मयत व्यक्तीचा अपघाताचा डाव आखण्यात आला असून, हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना केला होता. पोलिसांना सुरुवातीला आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. अखेर या प्रकरणी राजगड पोलिसांनी वेगवान गतीने तपास करुन एकाला खेड शिवापूरमधून ताब्यात घेतले होते. आरोपी स्वप्नील खुटवड याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता, मयत गणपत गेनबा खुटवड यांचा खून केल्याची कबुली त्याने दिली. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व राजगड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणच्या वतीने कारवाई करण्यात आली.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

आरोपीला खेड शिवापूरमधून घेतले ताब्यात 

या प्रकरणात मयताच्या डोक्याला जखम झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता परिस्थितीप्रमाणे घटना संशयित असून सदरचा प्रकार हा खूनाचा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली होती.  या प्रकरणातील आरोपी स्वप्निल खुटवड याच्यासोबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क झाला नाही. त्यामुळे त्याच्यावरील संशय अधिक बळावला. गुप्त बातमीदाराच्यामार्फत पोलिसांना स्वप्नील खेड शिवापूर परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी स्वप्नील खुटवड याला खेड शिवापूर परिसरातून ताब्यात घेतले. सुरूवातीला स्वप्निल खुटवड हा समाधानकारक उत्तरे देत नव्हता, परंतु त्यास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत व राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी यांनी विश्वासात घेवून विचारपूस केली. त्यावेळी त्याने खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.

यावेळी मयत गणपत खुटवड यांचे रेशनिंग दुकान आहे. तसेच तो काळुबाई देवीचा देवऋषी असून, तो करणी करतो व त्याने स्वप्निल खुटवड याला करणी केली आहे. त्यामुळे स्वप्निल खुटवड यांना रेशनिंग मिळण्याचे बंद झाले. व त्यांची आर्थिक प्रगती होत नाही, असा गैरसमज झाल्याने स्वप्निल खुटवड याच्या मनात गणपत खुटवड यांच्याविषयी प्रचंड राग होता. या रागातूच त्याने त्यांच्या डोक्यावर दगडाने आघात करून त्यांचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे प्रामीण, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार बारामती विभाग, एस.डी.पी.ओ.  तानाजी बरडे, भोर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षत दत्ताजी मोहिते, कुलदीप संकपाळ, अभिजीत सावंत, अंमलदार अमोल शेडगे, तुषार भोईटे, मंगेश भगत, सागर नामदास, राजु मोमीण, अतुल डेरे, बाळासाहेब खडके, राजगड पोलीस स्टेशनचे अजित पाटील, अंमलदार जगदीश शिरसाठ, नाना मदने, अक्षय नलावडे यांनी केली असून, पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन करत आहे.

Tags: crimenewsmurdermisterypunegraminrajgadnewsrajgadpolice
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
वेध विधानसभेचेः साताऱ्यात शिवसेना शिंदे गटाकडून विधानसभेच्या मोर्चे बांधणीला सुरूवात; लाडक्या बहिणींशी होणार संवाद: जिल्हाध्यक्षांनी घेतली कार्यकर्त्यांची बैठक

वेध विधानसभेचेः साताऱ्यात शिवसेना शिंदे गटाकडून विधानसभेच्या मोर्चे बांधणीला सुरूवात; लाडक्या बहिणींशी होणार संवाद: जिल्हाध्यक्षांनी घेतली कार्यकर्त्यांची बैठक

ताज्या बातम्या

महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

June 17, 2026
जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

June 16, 2026
मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

June 15, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group