Saturday, July 11, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुरंदरची कदमवस्ती शाळा ठरली दुसऱ्यांदा ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात अव्वल; विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांचा जल्लोष

by SBPRNL
October 20, 2024
पुरंदरची कदमवस्ती शाळा ठरली दुसऱ्यांदा ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात अव्वल; विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांचा जल्लोष

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

पुरंदरः विजयकुमार हरिश्चंद्रे

शिक्षक आणि ग्रामस्थांच्या समन्वयातून घडलेल्या जयाद्री खोऱ्यातील पुरंदरच्या जिल्हा परिषदेच्या कदमवस्ती प्राथमिक शाळा जिल्ह्यामध्ये अव्वल ठरल्याने विद्यार्थ्यां सह शिक्षक व ग्रामस्थानी आनंद व्यक्त करीत जल्लोष केला. यावेळी पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी संजय जाधव, केंद्रप्रमुख अनिल जगदाळे, अड बी एम काळे, संदीप कदम, नंदकुमार चव्हाण, संजय बारवकर आदी उपस्थित होते.

सहा वर्षांपूर्वी कदमवस्ती (ता.पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला जागा कमी पडत होती, म्हणून ग्रामस्थांनी सुमारे पन्नास लक्ष किंमतीची अकरा गुंठे जागा मोफत दिली. त्यावेळी हस्तांतर कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित राहण्याचा योग आला. त्या जागेवर ग्रामस्थांच्या व प्रशासनाच्या सहकार्याने टुमदार, आकर्षक व देखणी इमारत उभी राहिल्याचे पाहून निश्चित समाधान वाटते. शाळेकडे पाहून ज्ञानमंदिरात आल्याचे समाधान मिळते. येथील राज्य गुणवंत पुरस्कार प्राप्त शिक्षक अनंता जाधव व जिल्हा गुणवंत पुरस्कार प्राप्त शिक्षिका सुरेखा जाधव या दांपत्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी राबवत असलेले विविध उपक्रम पुणे जिल्ह्यातील शिक्षकांना प्रेरणादायी असल्याचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी व्यक्त केले.

शाळेला भेट देण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आवाहन

नुकताच पुणे जिल्हा अध्यक्ष चषक पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवस्ती (ता.पुरंदर) प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल पुणे जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी कदमवस्ती येथे भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. तालुक्यातील इतर शिक्षकांनी या शाळेला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले

…..म्हणून या शाळेला ज्ञानमंदीर म्हटले जाते

भेटी दरम्यान प्रवेशद्वाराची सुंदर कमान, बोलक्या व बालस्नेही भिंती, ज्ञान वृद्धिंगत करणारे व शिकण्याची गोडी लागेल असे शैक्षणिक तक्ते ,चित्रे, पेंटिंग्ज, संदेश, सुविचार, सामान्य ज्ञान, नकाशे, वर्गातच छोटीशी संगणक लॅब, मुलांना खेळण्यासाठी छोटीशी लॉन, घसरगुंडी, प्रवेशद्वारापासून वर्ग खोल्यांकडे नेणारा छोटासा रस्ता, पेव्हर ब्लॉक, वर्ग खोल्यांपुढे ठेवलेल्या कुंड्या व त्यातील फुलझाडे विद्यार्थ्यांकडे सोपवलेली झाडांची जबाबदारी, विद्यार्थ्यांचे साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र कपाटाचे कप्पे, प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्ही, व्हाईट बोर्ड, स्वतंत्र खोलीत अवांतर वाचनाची पुस्तके, भरपूर शैक्षणिक साहित्य, प्रश्नपेढी, प्रयोग साहित्य पाहून समाधान व्यक्त केले.

दुसऱ्यांदा ठरली सुंदर शाळा 

आजपर्यंत कदमवस्ती शाळा दत्तक घेतलेले, अड बी.एम. काळे, ग्रामस्थ व शिक्षक साकुर्डे व बेलसर ग्रामपंचायतींच्या समन्वयातून शाळेला पुरंदर तालुका सभापती चषक, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक १- अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये तृतीय क्रमांक, पुणे जिल्हा अध्यक्ष चषक, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पुरस्कार मिळाल्याबद्दल निश्चित समाधान असल्याचे येथील ग्रामस्थ संपत गरुड, ईश्वर कदम, गोकुळ कदम, विशाल चव्हाण, श्रीकांत कदम, संदीप टिळेकर, भरत चव्हाण, बबन कदम, हनुमंत कदम, प्रियंका चव्हाण यांनी सांगितले.

कदमवस्ती शाळेला जागा कमी पडत असल्याचे पाहून जवळपास ५० लक्ष रुपये किंमतीची ११ गुंठे जागा ग्रामस्थांनी शाळेसाठी मोफत दिली.तसेच अनेक मान्यवर, देणगीदार व लोकसहभागातून माळरान जागेवर अनंता व सुरेखा जाधव शिक्षक दाम्पत्यांनी विधेचे ज्ञानमंदिर (नंदनवन) उभारले. याचा सार्थ अभिमान वाटतो.

– संदीप कदम, अध्यक्ष पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघ

Tags: mukhyamantrimazishalasundarshalaPunepurandharrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
भाजपः उमेदवारांची पहिली यादी; चिंचवडमधून अश्विनी जगताप यांचा पत्ता कट, शंकर जगताप यांना उमेदवारी, भोकर मतदार संघातून अशोक चव्हान यांच्या मुलीला संधी..

भाजपः उमेदवारांची पहिली यादी; चिंचवडमधून अश्विनी जगताप यांचा पत्ता कट, शंकर जगताप यांना उमेदवारी, भोकर मतदार संघातून अशोक चव्हान यांच्या मुलीला संधी..

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group