Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल 1 day ago
Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम 1 day ago
Bhor – भोरच्या नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचा गैरव्यवहार उघडकीस; कर्जदार , संचालक, व्यवस्थापक  अशा ११२ जणांविरोधात गुन्हा दाखल 2 days ago
Bhor Crime News – भोरला सहा अज्ञातांकडुन चौपाटी येथे एका दांपत्यास मारहाण; अज्ञातांविरोधात भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल 3 days ago
 “ही मदत केवळ प्रसिद्धीसाठी नाही, तर आपली सेवा करण्याचा मनोभाव ठेवून केली – चंद्रकांत बाठे  3 days ago
Next
Prev
Home पुरंदर

पुरंदरचा बापू: ‘पलटूराम’ की ‘रामायणातील बिभीषण’? सोशल मीडियावर पत्र व्हायरल!

by Team Rajgad Publication
April 1, 2024
0
SHARES
662
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुरंदर:विजय शिवतारे यांच्या अचानक माघारीमुळे समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका कट्टर समर्थकाने पत्र लिहून शिवतारेंवर टीकेची झोड उठवली आहे.

शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेऊन माघार घेतल्याने त्यांच्या एका कट्टर कार्यकर्त्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे.  शिवतारेंनी अजित पवारांविरोधात ‘एल्गार’ पुकारला होता, मात्र ३० मार्च रोजी माघार घेतली.शिवतारेंनी पवारांना उर्मट, नालायक आणि माज उतरलेला म्हटले होते.सुनेत्रा पवार यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.आता ५ लाख ८० हजार पवार विरोधी मतदारांनी काय करावे?शिवतारे ‘पलटूराम’ आहेत का? शिवतारेंची राजकीय विश्वासार्हता शिल्लक आहे का? अजित पवारांचा काय साक्षात्कार झाला आहे? तुम्ही आता रामायणातले बिभिषण आहात की नाही ?सुनेत्रा पवार यांना मतदान का द्यावे? तुम्ही “फाडा पोस्टर निकला चूहा” नव्हेत का? तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांची काय काळजी घेतली?

You might also like

कचऱ्याच्या ढिगार्‍यातील “नसरापूर”! कचऱ्याची समस्या सोडविण्यात नसरापूर ग्रामपंचायत निष्फळ – भाग १

पळसोशी ओढ्यात बेकायदेशीर बांधकाम? निवेदन देऊन कारवाईची मागणी

आमचा स्वार्थ समाजाचे भले करण्याचा आहे – अजित पवार

कार्यकर्त्याने शिवतारेंना पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्याची मागणी केली आहे.या घटनेमुळे शिवसेनेत गोंधळ निर्माण झाला आहे. शिवतारेंच्या समर्थकांमध्ये नाराजीचे स्वर उमटत आहेत.

काय आहे त्या पत्रात

प्रति,

पुरंदरचा तह…

श्री. विजय बापू शिवतारे, शिवसेना नेते, पुरंदर

स.न.वि.वि. बापू, १३ मार्च २०२४ रोजी तुम्ही बंडाची भूमिका घेवून बारामती लोकसभेची निवडणूक ‘अपक्ष’ लढवण्याचा निर्धार केला. त्यानंतर मिडीयाने तुम्हाला अगदी डोक्यावर घेतलं. दर अर्ध्या तासाच्या बुलेटीनला ‘तुमची’ स्फोटक विधाने गाजू लागली. चॅनेल कुठलंही लावा दिसणार फक्त ‘शिवतारे बापू’ हे ठरलेलं. त्यानंतर तुम्ही जेजुरीच्या खंडोबाच्या साक्षीने ‘एल्गार’ पुकारला. पुढे तुमचे दौरे, भेटीगाठी, पत्रकार परिषद गाजू लागल्या. तुम्ही सुद्धा अगदी ‘राणा भीमदेवी’ थाटाने बोलत राहिलात. आरोप, टीका-टिप्पणी करू लागलात. ‘काहीही झालं तरी आता माघार नाही’, ‘बारामती कोणाची जाहागिरी नाही’ यासह तुमची अनेक विधाने गाजली. तुम्हाला समर्थक मिळाले. माय-बाप जनता, पदाधिकारी कार्यकर्ते यांची ‘वज्रमूठ’ तुम्ही उभी केली. प्रसंगी शिवसेनेचा ‘राजीनामा’ देवू. पण, आता निर्णय घेतलाय, हि तुमची भूमिका अवघ्या महाराष्ट्रात गाजली. घोडा-मैदान जवळ आलं असताना बापू, तुम्ही ३० मार्च २०२४ रोजी अचानक माघार घेतली आणि आमचीही मोठी अडचण झाली.

अजित पवारांची गुर्मी तशीच आहे. ते उर्मट आहेत. पण, अजित पवारांना तो पश्चात्तापही नाही. जणू काही लोकांना फसवणे हा त्यांचा जन्मजात अधिकार असल्या सारखे ते वागत आहेत. इथून मतदान घेऊन त्या जोरावर राज्यात, देशात ब्लॅकमेलिंग केलं जात आहे. हा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केला आहे. या पापाचं परिमार्जन आम्हा मतदारांनाच करावं लागेल. या रामायणातला रावणाच्या विरोधात लढणारा रामाच्या बरोबर असणारा बिभीषण विजय शिवतारे आहे, अशीही टीका बापू तुम्हीचं केली होती. मात्र, आज तुम्हाला अजित पवारांचा काय साक्षात्कार झाला आहे? आता तुम्ही रामायणातले बिभिषण आहात की नाही? हेही आम्हाला कळू द्या. बापू, पवारांच्या विरोधातल्या ५ लाख ८० हजार मतदारांनी आता नेमकं काय करायचं? आता तुम्हाला अजित पवार उर्मट व नालायक वाटत नाहीत का? तुमच्याचं भाषेत त्यांची गुर्मी आणि माज उतरला आहे का? सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी आहेत, म्हणून आम्ही त्यांना मतदान द्यायचं का? त्यांचं कॉलिफिकेशन काय? असा प्रश्न तुम्हीचं उपस्थित केला होता. मग आता आम्ही मतदार म्हणून सुनेत्रा वहिनींना मतदान कारायचं का आणि कशासाठी? यावरही बापू तुम्हीचं अधिकारवाणीने प्रकाश टाकला तर बरं होईल.

बापू, मी तुमचा कट्टर समर्थक आहे. तुमच्या राजकीय प्रवासात कायम तुमच्या पाठीशी उभा असतो आणि राहीन सुध्दा.तुम्ही म्हणाल तसं आजपर्यंत करीत आलो आहे. २०१९ ला सुध्दा अजित पवार यांच्या समर्थकांशी तुमच्यामुळे भांडलो आहे. कारण,तुम्ही माझे नेते आहात. पण, काल माझा नेता असा संधीसाधू, लेचापेचा, छक्के पंजे करणारा आणि पोटात एक आणि ओठात एकअसणारा निघाला, याचं फार वाईट वाटलं. बापू, ज्या मिडीयाने तुम्हाला डोक्यावर घेतलं, त्याचं मिडीयाने तुमची लया फार घालवून टाकलं. सोशल मिडीयात तर तुम्हाला ‘महाराष्ट्राचा पलटूराम’ म्हणून ‘हॅशटॅग’ फिरवला जात आहे. ‘पुरंदरचा मांडवली सम्राट’,’पाकीट भेटलं का?’, ‘घुमजाव’, ‘शिवतारे जमी पर’, ‘चिऊतारे’, ‘शेवटी, आपला आवाका दाखविला’, ‘५० खोके शिवतारे ओके’,अशा खोचक कंमेंटचा सोशल मिडीयात मुसळधार पाऊस पडतो आहे.

अजित पवारला माझा आवाका कळेल? म्हणणारे तुम्ही आवाका दाखविण्याच्या आधीच ‘शेपूट’ घातलंत. मुख्यमंत्र्यांनामाझ्यामुळे अडचण होत आहे, हे खतगावकर यांनी सांगितले. असं बाळबोध समर्थन करणाऱ्या विजय शिवतारेंना हे आधी समजलं नव्हतं का? आता त्या ५ लाख ८० हजार पवार विरोधी मतदारांनी नेमकं काय करायचं? हे तुम्ही सांगू शकाल का? तुम्ही स्वतः हा घटनाक्रम घडवून आणला की, तुमचा बोलविता धनी दुसराच कुणी होता? तुम्ही कुणाची स्क्रिप्ट वाचत होतात? आता तुमची वैयक्तिकभूमिका काय ? आज तुमची राजकीय विश्वासार्हता शिल्लक आहे का? तुम्ही म्हणजे ‘फाडा पोस्टर निकला चूहा’ नव्हेत का? आदरणीय बापू, याचीही उत्तरे तुम्ही दिलीच पाहिजेत. असो,हे सगळं वाचून तुम्हाला राग येईल. तुमची चिडचिड होईल. पण, बापू तुमचा कार्यकर्ता म्हणून समर्थन केलं. तेव्हा अख्खा गावानं दस्तुरखुद्द अजित पवार यांच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी मला वेड्यात काढलं आणि तुम्हाला ‘पोपटलाल’ म्हटलं. त्यामुळे चिडून मी सर्व पै पाहुणे, नातेवाईक, आप्तेष्ट, सगेसोयरे, मित्र परिवार, गावात आणि तालुक्यात तुमचा प्रचार केला. तुमची भूमिका लोकांना समजावून सांगितली. पण, आज तुम्ही माघार घेतली आणि माझी गोची झाली. आता लोक फोन करून माझ्यासह तुमचाही उध्दार करू लागलेत. त्यामुळे मी फोन बंद करून बसलोय. म्हणून आता तुम्हीचं एखादी पत्रकार परिषद घेवून या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या. तसाही पत्रकार परिषद घेवून ‘गोंधळ’ घालण्याचा तुम्हाला जुनाचं ‘नाद’ आहे. असो, जमेल तेवढं करा ओ. माझी अडचण होत आहे. तूर्तास तरी थांबतो !

कळावे आपला, कट्टर कार्यकर्ता.

Tags: Baramati Lokasabha
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर

कचऱ्याच्या ढिगार्‍यातील “नसरापूर”! कचऱ्याची समस्या सोडविण्यात नसरापूर ग्रामपंचायत निष्फळ – भाग १

May 25, 2024
भोर

पळसोशी ओढ्यात बेकायदेशीर बांधकाम? निवेदन देऊन कारवाईची मागणी

May 25, 2024
दौंड

आमचा स्वार्थ समाजाचे भले करण्याचा आहे – अजित पवार

May 5, 2024
भोर

बारामती लोकसभा मतदारसंघात १७ लाखाहून अधिक मतदार ओळख चिट्ठीचे वितरण..

May 4, 2024
भोर

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नसरापुरला उद्या विराट सभा

April 30, 2024
संपादकीय

लोकसभेच्या रणांगणात लढत नणंद-भावजयची, पण खरी झुंज काका पुतण्याचीच अन् बारामतीमधील वर्चस्वाची!

April 2, 2024

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0
खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल

खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल

June 21, 2025

Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम

June 21, 2025

Bhor – भोरच्या नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचा गैरव्यवहार उघडकीस; कर्जदार , संचालक, व्यवस्थापक  अशा ११२ जणांविरोधात गुन्हा दाखल

June 20, 2025

Bhor Crime News – भोरला सहा अज्ञातांकडुन चौपाटी येथे एका दांपत्यास मारहाण; अज्ञातांविरोधात भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

June 19, 2025

Recent News

खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल

खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल

June 21, 2025

Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम

June 21, 2025

Bhor – भोरच्या नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचा गैरव्यवहार उघडकीस; कर्जदार , संचालक, व्यवस्थापक  अशा ११२ जणांविरोधात गुन्हा दाखल

June 20, 2025

Bhor Crime News – भोरला सहा अज्ञातांकडुन चौपाटी येथे एका दांपत्यास मारहाण; अज्ञातांविरोधात भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

June 19, 2025

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.