सासवडः प्रतिनिधी खंडू जाधव
पुरंदर तालुक्यातील भिवडी हे आद्य क्रांतिवीर उमाजी राजे उमाजी नाईक यांचे जन्मगाव आहे. या गावांमध्ये राजे उमाजी नाईक यांचे वंशज आहेत. इंग्रजा विरुद्ध पहिला बंड पुकारणारे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या गावामध्ये, रामोशी, बेरड, बेडर समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्याबाबत रामोशी समाजाचे शिलेदार डॉ. भाऊसाहेब शिंदे हे गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारक भिवडी ता. पुरंदर येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत.
तसे पत्रव्यवहार त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांत, तहसिलदार, पोलीस प्रशासन, या सर्वांना पत्रव्यवहार केला असून, त्या संदर्भात सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी लहामट, गोपनीय पोलीस भगत यांनी उपोषण स्थळी येऊन जागेची पाहणी केली.
यावेळी भिवडीचे माजी सरपंच भैय्या खोमणे, पै. विकास (बल्ली) भांडवलकर, माजी सरपंच दिपक जावळे, निलेश चव्हाण हे उपस्थित होते.