जेजुरीः पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या १० उमेदवारांनी आपआपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहे. यामुळे आता एकूण १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी मुख्य लढत आघाडी विरुद्ध युती अशी असणार आहे. मात्र, येथे युतीमथून मैत्रीपूर्ण लढत पाहिला मिळणार हे आता स्पष्ट झाले आहे. एकूण ३३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काँग्रेसकडून संजय जगताप (हाताचा पंजा), युतीकडून विजय शिवतारे (धनुष्यबाण) तर संभाजीराव झेंडे हे घड्याळ चिन्हावर निवडणुकीला सामोरे जाणार आहे. राजकीय जाणकारांच्या मते येथे तिरंगी लढत होण्याची देखील एक शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी बंडोबा थंड करण्यात काही अंशी यश आलं आहे पण अनेक ठिकाणी बंडखोरांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. पुरंदर-हवेलीसाठी निडणुकीच्या रणांगणात तीन प्रबळ दावेदार मिळाले आहेत. विविध मुद्यांनी ग्रासलेले या मतदार संघात कोण विजयाची पताका फडकवित हे पाहणे महत्वाचे असणार आहे. उमेदवारी अर्ज घेतलेल्या पैकी अनेकजण युतीमधील घटक पक्षातील विविध पदांवर कार्यकर्त असणार पदाधिकारी आहेत. यापैकी जालिंदार कामठे(भाजप) यांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता. त्यांनी मुंबईला बैठकीसाठी बोलावले होते. त्या दृष्टीने पक्षातील पदाधिकारी मुंबईला बैठकला गेलो. युतीमधील प्रत्येक जागा महत्वाची असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले आहे. त्या दृष्टीने आता आम्ही कामाला लागणार आहोत.