पुणेः शालेय विद्यार्थी व पालकांसाठी रमेश बापू कोंडे (ramesh bapu konde) मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या “आई बाप समजून घेताना” या व्याख्यानमाला वि्द्यार्थी व पालक यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या व्याख्यानमालेस जवळपास २५०० विद्यार्थी आणि ८०० पालक उपस्थित होते. यावेळी आई बाप समजून घेताना हे व्याख्यान वसंत हंकारे यांच्या वतीने देण्यात आले. दि. ३ सप्टेंबर रोजी ही व्याख्यानमाला ११ ते १ या वेळेत रोह गार्डन मंगल कार्यालय, कात्रज-नवले ब्रीज रोड आंबेगाव, पुणे येथे संपन्न झाली. विविध मान्यवरांन देखील या व्याख्यानमालेस उपस्थिती दर्शवली.
आई वडिलांची, त्याच्या प्रेमाची सावली आपल्यावर असणे यासारखे भाग्य नाही. माझ्या दुर्दैवाने लहानपणीच हे छत्र हरपले. जेव्हा जेव्हा ह्या कार्यक्रमाचे आयोजन करतो, तेव्हा तेव्हा पहिला हाच विचार येतो की, ज्यांच्या नशिबात आई वडिलांच्या सोबत असण्याचे भाग्य आहे, ते नशीबवान आहेत. हंकारे सर या कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन्ही पिढ्यांमध्ये एक दुवा जोडत आहे. त्याचे मनापासून आभार
रमेश बापू कोंडे (शिवसेना जिल्हाप्रमुख, पुणे)