पुणेः पुणे जिल्ह्यातील कुदळवाडी परिसरात असलेल्या भंगाराच्या गोदामांना आज. दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी भीषण आग लागली. या भीषण आगिच्या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले असून तब्बल १०० हून अधिक दुकाने भंगाराचे गोदामे जळून खाक झाली आहेत. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट हवेत येत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण तयार झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कुदळवाडी परिसरात असलेल्या भंगार गोदामांना सोमवारी सकाळी भीषण आग लागली. ही आग एवढी भीषण होती की, आग विझवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दल विभागाची सर्व 15 अग्निशमन वाहने आणि पुणे महापालिकेची पीएमआरडीएची आणि टाटा मोटर्ससारख्या अनेक खाजगी कंपन्यांची अग्निशमन वाहने तैनात करण्यात आली होती.
आता आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी थोडा वेळ लागेल, आणि किती दुकाने जळून खाक झाली हे अद्याप आम्हाला कळू शकलेले नाही. कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत भूतकाळात या ठिकाणाहून लहान-मोठ्या औद्योगिक युनिट्स आणि भंगार गोदामांना आग लागण्याच्या अनेक घटना नोंदवण्यात आल्या होत्या. यावर्षी एप्रिलमध्ये देखील या परिसरात भीषण आग लागली होती.
मनोज लोणकर अग्निशमन विभागाचे प्रमुख