पुणेः (प्रतिनिधी वर्षा काळे)
पश्चिम बंगालमधील R.G.Kar Medical Collage येथे एका शिकाऊ महिला डॉक्टरसोबत क्रूर मानसिकतेच्या नराधमानी दुष्कर्म करून त्या महिलेची निर्घृणपणे हत्या केली होती. या घटनेचे पडसाद संबंध देशात उमटले असून, राज्यात देखील या प्रकरणी निदर्शने करण्यात येत आहे. तसेच या घटनेतील दोषीवर कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी देखील मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणे आणि वैद्यकीय विद्यार्थी एकवटले होते. त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला असून, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
डॉक्टर महिलेवर बलात्कार करून तिची निर्घूनपणे हत्या करण्यात आली. या घटनेची दखल घेता तिला वाचवण्या ऐवजी तिने आत्महत्या केली असे घोषित करण्यात आले. नंतर काही प्रकार उघडकीस आले TMC च्या गुंड्यानी hospital फोडण्याचा पर्यंत केला आणि हा सर्व प्रकार दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मात्र जेव्हा ही घटना समोर आली, तेव्हा त्या महिला डॉक्टरची हत्या करण्यात आली आहे. हे उघडकीस आले. या सर्व घटनेचा निषेध करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद निषेध करत सरकारकडे लवकरात लवकर या विद्यार्थीनीला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी करीत असल्याचे विद्यार्थ्यींनी सांगितले. तसेच दोषी आहेत त्यांच्यावर कठोरातील कठोर शिक्षा करुन फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी देखील मागणी केली आहे.